Yuri Alemao, Goa Assembly Dainik Gomantak
गोवा

Goa Road Safety: '20 कोटी' दंड वसूल, मग अपघातप्रवण क्षेत्रे का सुधारली नाहीत? आलेमाव यांचा विधानसभेत सवाल

Yuri Alemao: राज्यात १६ लाख लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे १५ लाख वाहने नोंद आहेत. ही वाहनसंख्या वाढली आहे कारण लोकांचा सार्वजनिक वाहतूक सेवेवर विश्वास राहिला नाही.

Sameer Panditrao

पणजी: राज्य सरकारने वाहतूक नियमभंगाच्या बदल्यात २० कोटी रुपयांवर दंड वसूल केला. त्यातून कोणती सुधारणा अपघातप्रवण क्षेत्रांत केली. खरेतर रस्त्यांची सुरक्षितताविषयक तपासणी होणे आवश्यक आहे, असे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज रात्री विधानसभेत व्यक्त केले.

वाहतूक, उद्योग व्यापार व वाणिज्य आणि पंचायत खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवर मांडलेल्या कपात सूचनांना पाठिंबा देताना ते बोलत होते. ते म्हणाले, वेर्णा, पणजी, पर्वरी, जुने गोवा आणि मायणा कुडतरी ही अपघात प्रवण क्षेत्रे झाली आहेत. वाहतूक खात्याने २०२४ मध्ये ३ लाख जणांवर दंडात्मक कारवाई केली. ३२ हजार परवाने निलंबित केले, खात्याला २० कोटींवर दंडाची रक्कम मिळाली, तर काही बदल झाला काय असा प्रश्न आहे.

राज्यात १६ लाख लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे १५ लाख वाहने नोंद आहेत. ही वाहनसंख्या वाढली आहे कारण लोकांचा सार्वजनिक वाहतूक सेवेवर विश्वास राहिला नाही. सन २०२४ मध्ये २६०७ अपघात झाले त्यात यावर्षी आत्तापर्यंत २७०० अपघात झाले आहेत.

अपघातातील मृत्यूची संख्या सांगत त्यांनी सभागृहात हा विषय गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. अपघात प्रवण क्षेत्रे पुन्हा तपासली पाहिजेत, रेन्ट अण्ड बाईकवाल्यांची तपासणी झाली पाहिजे. शहरातील रस्ते स्मार्ट झाले पाहिजेत, आवश्यक ते फलक असणे गरजेचे आहेत. महिन्याकाठी दरवेळी नव्याने अपघातांविषयी जागृती झाली पाहिजे असे सांगून त्यांनी माजी राज्यपाल प्रतापसिंग गील यांनी गोव्याविषयी केलेल्या भविष्यवाणीचा उल्लेख केला. निर्बंध हवेत

युरी म्हणाले, रेन्ट अ कॅब कुठेही पार्क केल्या जातात. त्यावर निर्बंध हवेत. एवढे मोठे महामार्ग बांधले आहेत, तेथे सीसीटीव्ही आहेत का? शौचालय, फूड कोर्ट, २५ किलोमीटरवर अत्यावश्यक सेवा आहे काय, असा सवाल त्यांनी केला. टॅक्सी अग्रीगेटरविषयी आणलेले धोरण तुम्ही रद्द करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT