Goa Weather| Goa Winter | Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Winter: राज्यात पुढील 4 दिवस थंडीचे! वेधशाळेचा इशारा; दाबोळीत 17.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Goa Weather Update: मागील काही दिवस थंडी कमी झाली असे वाटत असतानाच राज्यात दाबोळी येथे १७.४ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मागील काही दिवस थंडी कमी झाली असे वाटत असतानाच राज्यात दाबोळी येथे १७.४ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. पुढील चार दिवस ही थंडी कायम राहणार असून पारा १९ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे.

राज्यात कमाल आणि किमान तापमानातही घट नोंदविण्यात आली असून सामान्य कमाल तापमानाच्या तुलनेत -१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमानाच्या तुलनेत -१.६ अंश सेल्सिअसची नोंद केली आहे, अशी मािहतीही वेधशाळेने दिली.

उपलब्ध आकडेवारीनुसार, यापूर्वी डिसेंबरमध्ये ४ डिसेंबर १९७० साली नीचांकी १६ अंश सेल्सिअसपर्यंत पारा गेला होता. यंदाच्या हिवाळ्यात २१ डिसेंबर रोजी १७.१ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद केली असून त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे तापमान म्हणजेच १७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यान, नागरिकांनी वाढत्या थंडीत आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि रात्रीच्यावेळी आवश्‍यकता नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ugvem Highway Landslide: उगवे महामार्गावर पुन्हा कोसळली दरड! आठवड्यातील तिसरी घटना; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक 9चा फेरविकास अखेर रखडला, युद्धाचा फटका; 1,300 कोटींच्या निधीला केंद्राकडून नकार

Private Bus Service: मुसळधार पावसाचा फटका! गोव्यातून पुणे-मुंबईकडे जाणारी खासगी बससेवा विस्कळीत

अभिनेता सलमान खानला उच्च न्यायालयाची नोटीस, कांदोळी व्हिला बांधकामाविरोधातील जनहित याचिकेची दखल; यंत्रणांनाही नोटिसा

Horoscope: मंगळवारचा दिवस ठरणार भाग्यवर्धक! अनेक राशींना करिअरमध्ये यश, व्यवसायात नफा आणि धनलाभाचे प्रबळ योग

SCROLL FOR NEXT