Goa Weather| Goa Winter | Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Winter: धुक्यात हरवला गोवा! हुडहुडी वाढली; पुढचे 2 दिवस कसे राहणार हवामान? वाचा..

Goa Weather: राज्यात किमान तापमानासोबतच आर्द्रेतेतही मोठ्या प्रमाणात घट नोंद करण्यात आली. राज्यात किमान ६१ टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत -१३ वर पोहोचली होती.

Sameer Panditrao

पणजी: उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्याचा प्रभाव पुन्हा वाढला असल्याने राज्यात किमान तापमानाचा पारा १८.१ अंशांवर गेला असून सामान्य किमान तापमानाच्या तुलनेत -२.५ अंशांनी घटले आहे. यंदाच्या तापमानातील हे दुसरे नीचांकी तापमान आहे.

यंदा १२ डिसेंबर रोजी सर्वात कमी म्हणजे १७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. राज्यात किमान तापमानासोबतच आर्द्रेतेतही मोठ्या प्रमाणात घट नोंद करण्यात आली. राज्यात किमान ६१ टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत -१३ वर पोहोचली होती.

राज्यात पुढील तीन-चार दिवस किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता गोवा वेधशाळेकडून वर्तविण्यात आली असून पहाटे दव व धुके पडण्याची शक्यता देखील आहे.

आकडेवारीनुसार, आतापर्यंत १२ डिसेंबर १९८१ साली सर्वांत कमी म्हणजेच १५.७ अंश सेल्सिअसवर किमान पारा गेला होता. अनेकदा डिसेंबरमध्ये तापमानात १६, १७ अंशांवर गेले आहे. राज्यात वाढत्या थंडीमुळे संसर्गजन्य आजारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

खोकला, पडसे, ताप, अंगदुखी, पोटदुखी असे आजार वाढले असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वाढत्या थंडीमुळे राज्यात रात्रीपासून पहाटेपर्यंत धुके, तसेच मोठ्या प्रमाणात दव पडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT