Coconut Feni Goa Dainik Gomantak
गोवा

Coconut Feni GI Tag: माडाच्या 'या' तिन्ही पदार्थाना GI Tag मिळावा, गोवा फॉरवर्डची सरकारकडे मागणी

विजय सरदेसाई यांचे मुख्य सचिवांना पत्र: परंपरेशी सांगड असल्याचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

Coconut Feni GI Tag माडाची फेणी, माडाचा गूळ आणि व्हिनेगर या तीन वस्तूंना जी आय टॅग मिळावा अशी गोवा टॉडी टेपर्स संघटनेने जी मागणी केली आहे तिला गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पाठिंबा दिला असून यासाठी सरकार पातळीवर त्वरित प्रयत्न सुरू करावेत आशी मागणी करणारे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविले आहे.

माडाच्या फेणीला 400 वर्षांचा इतिहास आहे. ते फक्त साधे पेय नाही तर गोव्याच्या परंपरेशी त्याचा संबंध आहे. अशा पेयाला विश्व मान्यता मिळण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

माडाचा गुळ आणि व्हिनेगर यांनाही गोव्याच्या खानपान संस्कृतीत विशेष स्थान आहे. या पदार्थांचा आणि त्याच्या स्वादाचा आमच्या संस्कृतीशी संबंध आहे याकडे सरदेसाई यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

ही बाब लक्षात घेउन या तिन्ही पदार्थाना जी आय टॅग मिळावा यासाठी जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खूषखबर! 'काजू फेणी' जाणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत; ‘काजकार’ला मिळाले GI Certification

Goa Live Updates: शिक्षक नोकरी घोटाळ्यातील सह-आरोपी सुनीता पावसकरला सशर्त जामीन मंजूर

Goa Police: गोवा पोलीस खात्यात बदल्यांचा आदेश! 11 उपअधीक्षकांची यादी; 4 जणांकडे अतिरिक्त ताबा

Devdarshan Yatra: डिसेंबरपासून राज्य सरकार पुन्हा सुरु करणार 'देवदर्शन यात्रा'

Maharashtra Politics: काँग्रेसचं आरक्षणविरोधी धोरण, राहुल गांधींच्या वक्तव्याशी नाना पटोलेंची सहमती; भाजपचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT