Coconut  Dainik Gomantak
गोवा

GI Tag: जीआय मानांकन यादीत आता करवंटीला स्थान, राज्यातील हस्तकला वर्गामार्फत दाखल झालाय पहिलाच अर्ज

दीपक परब : रोजगारात वृद्धी

गोमन्तक डिजिटल टीम

GI Tag अंगभूत वैशिष्ट्यांमुळे राज्यातील काजूगर, खोला मिरची, हरमल मिरची, मयंडोळी केळी, गोवन खाजे, मानकुराद आंबा, आगशीची वांगी, बिबिंका, सातशिरो भेंडी यांना प्रतिष्ठेचे ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे.

आता नारळाचे कोरीव काम आणि नारळाच्या कवचापासून बनवलेल्या वस्तूंना प्रादेशिक मानांकन जीआय मिळणार आहे, अशी माहिती जीआय मानांकन नोडल अधिकारी दीपक परब यांनी दिली.

परब म्हणाले की, राज्यातील कारागिरांद्वारे नारळाच्या कवचावर कोरीव काम करून 60पेक्षा जास्त वस्तू तयार केल्या जातात. काही कारागिरांनी कवच पावडर वापरून 600 हून अधिक वस्तू तयार केल्या.

या वस्तूंना प्रादेशिक मानांकन ‘जीआय’ मिळवण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान आणि पर्यावरण खात्याच्या जीआय विभागामार्फत प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्यातील हस्तकला वर्गातील हा पहिला अर्ज आहे.

खात्यामार्फत सर्व सोपस्कार करून पुढील प्रक्रियेसाठी तो पाठविला आहे. अशा वस्तू प्लास्टिकसाठी चांगला पर्याय ठरल्या असून त्यांना प्रचंड मागणी आहे.

यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यासाठीचा कच्चा माल राज्यात मुबलक आणि स्वस्त दरात उपलब्ध आहे.

कारागीर संघटना उभारणार

परब म्हणाले की, आम्हाला नारळावर कलाकुसर करणाऱ्या कारागिरांची आवश्‍यकता आहे. त्यांनी पुढे येऊन आमच्याकडे नोंदणी करावी, जेणेकरून त्यांना जीआय प्रक्रियेत सामील करण्यासाठी त्यांची संघटना तयार करता येईल.

कळंगुट नारळाची लहान-मोठ्या आकाराची विविधता हस्तकला वस्तूंसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. किनाऱ्यालगतची नारळाची झाडे मोठ्या आकाराचे नारळ देतात. ते दिवे, फेनी बाटल्या आदी वस्तूंसाठी आणि कोरीव कामासाठी वापरले जातात.

गृहोपयोगी वस्तूंची निर्मिती :

नारळाच्या कवचापासून कप, मग, साबणाची केस, पेपर होल्डर, पेन होल्डर, की चेन, दिवा, समई, प्लांटर, चमचे, देवी-देवता तसेच राष्ट्रीय नेत्यांचे चेहरे, फेणी बाटल्या, मासे, कासव, वाट्या, मेणबत्ती स्टॅण्ड बनवले जाते. या वस्तू तयार करताना तयार होणारी पावडर धूपबत्ती बनवण्यासाठी वापरली जाते, असेही दीपक परब म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025: सिनेरसिकांसाठी 'इफ्फी'चा मेजवानी मोसम सुरू, पत्रकारांसाठी 'चित्रपट रसग्रहण' अभ्यासक्रम; 'FTII'चे आयोजन

World Cup 2025 Semifinal: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! सेमीफायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास 'या' संघाला मिळणार फायनलचं तिकीट, नियम वाचा

Goa Crime: बालकांवरील अत्याचारप्रकरणी हेमंत दास दोषी, बालन्यायालयाचा निवाडा; 2 मुलांना बनवले होते वासनेची शिकार

Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतीसाठी 'बॅलेट पेपर'चा वापर, पाच कोटींचा होणार खर्च; मतदारयादीत नवी नावे जोडणे स्थगित

Goa Politics: 'माझे घर'ला 'खो' घालण्याचा यत्न, विरोधी आमदारांना धडा शिकवा; CM प्रमोद सावंतांचे जनतेला आवाहन

SCROLL FOR NEXT