पणजी: गोवा किनारपट्टी क्षेत्रिय प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) नार्वे येथील फेरीबोटीच्या वाहतुकीस अडथळा आणणारे बार- तथा रेस्टॉरंट पाडण्याचे आदेश दिले आहेत. नदी परिवहन विभागाने डिचोली येथील नगर नियोजन विभागाचे (टीसीपी) उपनगर नियोजक आणि ‘जीसीझेडएमए’कडे या फेरी रॅम्पच्या पुढेच केलेल्या बांधकामाबाबत तक्रार केली होती.
किनारपट्टी प्राधिकरणाने जानेवारी २०२४ मध्ये या ठिकाणाची तपासणी केली आणि असे आढळून आले की हे बांधकाम २०११ च्या सीआरझेड अधिसूचनेचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले होते. हे बांधकाम सीआरझेड क्षेत्रात असल्याचे आढळून आले, हा भाग ‘नो डेव्हल्पमेंट झोन’ आहे. तसेच खारफुटीच्या बफर झोनलाही या बांधकामामुळे फटका बसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते.
संबंधित बांधकाम मालकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. ‘जीसीझेडएमए’ने आपल्या आदेशात म्हटले आहे की, प्राधिकरणाचा कोणताही ना हरकत दाखला नसतानाही उपरोक्त बांधकाम पूर्णपणे अनधिकृत आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे ते सीआरझेड नियमांचे उल्लंघन करणारे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.