Goa Tourism| Goa News Dainik Gomantak
गोवा

New Year 2023: सावधान! नववर्षाच्या पूर्वसंध्येला किनारी भागात सुरक्षा कडक; पेट्रोलिंगसाठी पोलिस सज्ज

देशी पर्यटकांची गर्दी : अवैध प्रकार रोखणे हाच उद्देश; पेट्रोलिंगसाठी पोलिस सज्ज

दैनिक गोमन्तक

Goa Beaches: पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल, केरी-तेरेखोल हे किनारे नाताळाच्या निमित्ताने आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. पेडणेचे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या नेतृत्वाखाली सध्या किनारी भागात मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा पेट्रोलिंग करत असल्याचे चित्र दिसत आहे.

राऊत यांनी सांगितले की, किनारी भागात एखाद्या वेळी कुणालाही संशयास्पद गोष्टी दिसून आल्या तर त्यांनी त्वरित पोलिसांकडे संपर्क साधावा. कायदा कोणीही हातात घेऊ नये. एखाद्यावेळी टॅक्सीचालकदेखील पर्यटकांना सतावत असेल तर त्या पद्धतीचीही तक्रार पोलिसांकडे यायला हवी.

किनारी भागात ज्या ठिकाणी पर्यटक आराम करतात त्या ठिकाणी जर भटक्या समाजाने किंवा भिकारी आणि इतर व्यावसायिकांनी त्यांना सतावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. त्यासाठी किनारी भागात सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पेट्रोलिंग केले जाईल.

पार्टी नाही, तर पर्यटक नाहीत

मोरजीतील एका पार्टी आयोजकाने सांगितले की, पर्यटक हे फक्त पार्ट्यांसाठीच येतात. त्यामुळे पर्यटक टॅक्सींना भाडे मिळते. पार्ट्यांमुळे ध्वनी प्रदूषण होते. स्थानिकांना व विद्यार्थ्यांना त्रास होतो, असे विचारल्यावर स्थानिकांची तोंडे पैशांनी बंद केली जातात. ज्यांना पैसे मिळत नाहीत ते आवाज करतात, असेही त्याने सांगितले.

करोडो रुपयांची उलाढाल?

रात्री बारा वाजेपर्यंत संगीत वाजवण्यास परवानगी घेऊन काहीजण पार्ट्यांचे आयोजन करतात. नंतर मात्र नियमांचा गैरवापर करून पहाटेपर्यंत संगीत चालवतात. 500 ते 2000 पर्यटक एका-एका पार्टीत सहभागी असतात. या पार्ट्यामध्ये सहभागी होण्यासाठी 300 ते 500 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते.

राखावी लागते मर्जी

पार्टी सुरू असताना नार्कोटिक पथक येते आणि येथे ड्रग्सचा वापर होत असल्याचे सांगतात. जर अर्थपूर्ण समझोता झाला नाही तर एका-दोघा पर्यटकांना जे ड्रग्स ओढतात त्यांना ताब्यात घेतो, अशी धमकी देतात. ही धमकी दिल्यावर त्यांची मर्जी राखावी लागते.

पेडणे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या नेतृत्वाखाली मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात जे गैरव्यवहार चालू आहेत. त्यांच्याविरोधात जी मोहीम पोलिसांनी उघडलेली आहे, ती मोहीम पर्यटनाच्या दृष्टीने योग्य असून त्यामुळे पर्यटकही सुखावलेले आहेत. त्यामुळे आपण या पोलिसांचे आणि पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांचे अभिनंदन करते.- अनुपमा मयेकर, पंच, मोरजी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT