कॉंग्रेस नेते अमरनाथ पणजीकर
कॉंग्रेस नेते अमरनाथ पणजीकर  Dainik Gomantak
गोवा

'युवकांना सरकारच्या योजनांची माहिती नसणे हे मुख्यमंत्र्यांचे अपयश'

Dainik Gomantak

Goa: गोव्यात मागील दहा वर्षात सरकारने (Goa Govt) माजवलेल्या बजबजपुरीची झळ आता भाजपला बसु लागली असुन, सरकारच्या योजनांची आपणांस माहितीच नाही असे 'स्वयंपुर्ण युवा' (Swayampurn Yuva) कार्यक्रमात सहभागी गोमंतकीय युवकांनी डॉ. प्रमोद सावंताना (CM Dr Sawant) स्पष्ट सांगुन एक प्रकारे त्यांना जोरदार थप्पडच लगावली अशी जोरदार टीका कॉंग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर (Congress Leader Amarnath Panajikar) यांनी केली.

कॉंग्रेस भवनात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वयंपुर्ण युवा कार्यक्रमांत युवकांची थट्टा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा समाचार घेत भाजप सरकारच वाढत्या बेरोजगारीला जबाबदार असल्याचा दावा केला. यावेळी युवा कॉंग्रेस नेते साईश आरोसकर व एनएससुआयचे अध्यक्ष नौशाध चौधरी हजर होते.

भाजपने 2012 च्या निवडणुकांत 50 हजार नोकऱ्या देण्याचे जाहिर केले होते. युवकांना बेकारी भत्ता देण्याचे खोटे आश्वासन देत भाजपने सत्ता बळकावली. आज त्यांची सर्व खोटी आश्वासने जुमला असल्याचे सिद्ध झाले आहे.

गोवा इनव्हेस्टमेंट प्रोमोशन बोर्ड द्वारे मंजुर झालेले अनेक तथाकथीत प्रकल्प आज भाजप सरकारच्या अंधकारात गायब झाले आहेत. आज कनिष्ट कारकुनाच्या पदासाठी भाजपवाले १३ लाख रुपयांची मागणी करीत असल्याचा गौप्यस्पोट अमरनाथ पणजीकर यांनी केला.

गोव्यात कॉंग्रेसचे सरकार स्थापन होणार ही आता काळ्या दगडावरची रेषा आहे. आम्ही सर्व खात्यांतील नोकरभरतीवर लक्ष ठेवण्यासाठी खास पथके तयार केली असुन, बेकायदेशीरपणे नोकरी मिळवीणाऱ्यांना आम्ही कडक शिक्षा करणार आहोत. त्यामुळे नोकरी विकत घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना नंतर परिणाम भोगावे लागतील असा कडक इशारा अमरनाथ पणजीकर यांनी दिला आहे.

भाजप सरकार कंत्राटी पद्धतीवर पाच वर्षे काम केलेल्यांना कधी सेवेत कायम करणार, पॅरा शिक्षक तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्यांना सेवेत केव्हा कायम करणार हे मुख्यमंत्र्यानी जाहिर करावे अशी मागणी पणजीकर यांनी केलीं

गोव्यातील बेरोजगारीचा दर जवळजवळ ३५ टक्के आहे. भाजपच्या नाकर्तेपणानेच आज अशी परिस्थिती आली असुन, मुख्यमंत्र्यांनी हिम्मत असेल तर भाजप सरकारने दिलेल्या नोकऱ्यांचा तपशील उघड करावा असे उघड आव्हान अमरनाथ पणजीकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

भाजपच्या 'मिशन कमिशन' ने आज गोव्यातील प्रत्येक व्यापारी क्षेत्र रसातळाला गेले आहे. खासगी क्षेत्रात आज प्रचंड कपात करण्यात आली असुन, पगारही कमी करण्यात आले आहेत. अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. पत्रकारांनाही याचा अनुभव आला असुन, २५ वर्षे सेवेत असलेल्यानांही कामावरुन काढुन टाकण्यात आले आहे. भाजप सरकारने विश्वासाहर्ता गमावल्यानेच युवक तसेच गोमंतकीय आज सरकारच्या योजनांकडे बघत सुद्धा नाहीत असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

भाजपच्या 'स्वयंपुर्ण युवा" कार्यक्रमात सपशेल अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांना आरसा दाखवणाऱ्या सर्व स्वाभिमानी युवकांचे आम्ही अभिनंदन करतो. कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्राधान्यक्रमाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतील असे अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT