37th National Games Dainik Gomantak
गोवा

37th National Games: सरकार यापुढे क्रीडा पर्यटनावर भर देणार : मुख्यमंत्री सावंत

साधनसुविधांची क्रीडामंत्र्यांसह पाहणी

दैनिक गोमन्तक

37th National Games Heald In Goa: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडा पर्यटनाचे एक नवे दालन गोव्यासाठी खुले होत आहे. पर्यटनाच्या या नव्या प्रकारावर राज्य सरकार यापुढे भर देईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पेडे - म्हापसा येथे सांगितले.

यावेळी त्यांच्यासमवेत क्रीडामंत्री गोविंद गावडे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी पेडे येथील स्पोर्ट्स कॉम्पलेक्सची पाहणी केली.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने साधनसुविधांची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले, "गोव्याला पर्यटनाच्या जागतिक नकाशावर यापूर्वीच स्थान आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धांसाठीच्या सोयीसुविधा राज्यात विकसित केल्या गेल्या आहेत."

"त्यांचा वापर स्पर्धेनंतरही केला जाणार आहे आणि याला पर्यटनाची जोड दिली जाणार आहे. स्पर्धा पाहण्यासाठी, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जागतिक पातळीवरून अनेकजण येत असतात हेच पर्यटनाचे दुसरे चांगले अंग आहे. असे हे क्रीडा पर्यटन विकसित करण्यास वाव आहे आणि ती संधी राज्य सरकार घेईल."

वार्का येथील किनाऱ्यावर १९ पासून जागतिक बीच व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा संदर्भ घेत मुख्यमंत्री म्हणाले, "मार्चमध्ये जागतिक पातळीवरील टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन गोव्यात झाले होते."

"सागरी पर्यटन, साहसी पर्यटन, धार्मिक पर्यटन, आरोग्य पर्यटन अशा विविध पर्यटन प्रकारांमध्येच क्रीडा पर्यटनही आहे. यासाठीही यापुढे गोव्याला अनेकजण भेट देतील. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेने ती संधी राज्याला उपलब्ध करून दिली आहे".

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT