Pernem Zoning Plan: अखेर पेडणे झोनिंग प्लॅन रद्द; स्थानिकांना विश्वासात घेवूनच पूढील निर्णय : मंत्री राणे

आराखडा रद्दच करावा यासाठी स्थानिक नागरिक आग्रही आहेत.
TCP Minister Vishwajit Rane
TCP Minister Vishwajit Rane Dainik Gomantak
Published on
Updated on

Pernem Zoning Plan Scrapped: पेडण्यातील भू-रुपांतर आराखड्याचा मसुदा अखेर रद्द करण्यात आला आहे. स्थानिकांना विश्वासात घेवूनच पूढील निर्णय घेणार असल्याची माहिती नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

गेल्या आठवडाभरापासून पेडणे तालुका जमीन रूपांतर आराखडा चर्चेत आहे. हा आराखडा रद्दच करावा, यासाठी स्थानिक नागरिक आग्रही आहेत.

या आराखड्याबाबत बुधवारी मुख्यमंत्र्यांनी सरकारचे धोरण स्पष्ट करत पंचायती, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विश्‍वासात घेऊनच याबाबत निर्णय घेऊ, अशा शब्दांत पेडणेतील लोकांना आश्‍वस्त केले होते.

TCP Minister Vishwajit Rane
Kizomba Goa: आंतरराष्ट्रीय स्तरावर आफ्रिकन 'किझोम्बा' चा प्रचार करणारा गोमंतकीय

दरम्यान शुक्रवारी नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी यांनी हा आराखड्याचा मसुदा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली.

ऑर्चड जागेतील घरांना सेटलमेंटमध्ये आणून संरक्षण देणार आहे. तसेच जमीन रूपांतर आराखड्याबाबतचा पूढील निर्णय स्थानिकांना विश्वासात घेवूनच घेण्यात येईल असे मंत्री राणे यांनी सांगितले.

या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनीही प्रतिक्रीया दिली. म्हणाले, पेडणेतील जनतेच्या लोकभावनेचा आदर करुन झोनिंग प्लॅन रद्द करण्यात आला. पेडणेकरांना विश्वासात घेवूनच विकास केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.

"पेडणे तालुक्यातील लोकांना या निर्णयामूळे न्याय मिळाला आहे. झोनिंगचा निर्णय पेडणेकरांच्या बाजूने न्हवता. पेडण्यातील स्थानिकांना विश्वासात घेवून पेडण्याचा विकास करावा. मंत्री राणेंनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली.

TCP Minister Vishwajit Rane
Colvale Jail: धक्कादायक! सुपारी देऊन बेल्लारीच्‍या साथीदारांना कारागृहातच मारण्याचा डाव; नक्की काय आहे प्रकरण..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

forest minister vishwajit rane wildlife conservation meeting
Goa Green Zone
Goa TCP No Development Zone
Forest Minister Vishwajit Rane
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com