pramod sawant.jpg 
गोवा

Goa : लसीचा पहिला डोस देईपर्यंत पर्यटन क्षेत्र खुले करण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार कायम

दैनिक गोमंतक

पणजी : गोव्यातील (Goa) प्रत्येक नागरिकास कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देईपर्यंत पर्यटन क्षेत्र (Tourist Area) खुले करण्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) यांनी पुन्हा एकदा नकार दिला आहे. या संदर्भातात विचारले असता ते म्हणाले, कोविडच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सध्या सुरू आहे. त्याबाबत निश्चित काही सांगता येत नाही. सरकार सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पर्यटन क्षेत्र कधी खुले होईल याची विचारणा बर्‍याचदा केली जाते. येत्या 30 जुलैपर्यंत राज्यातील प्रत्येक नागरिकास कोविड प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्रा देण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. प्रत्येकास या लसीची पहिली मात्रा दिल्यानंतरच पर्यटन क्षेत्र खुले करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

गोव्यामध्ये सर्वसाधारणपणे ऑक्‍टोबरपासून पर्यटन हंगामास सुरुवात होते. किनाऱ्यावर तात्पुरत्या स्वरूपात घालण्यात येणाऱ्या शॅकसाठी सप्टेंबर मध्ये परवाने देणे सुरू होते. त्यानंतर ऑक्‍टोबरपासून पर्यटन हंगाम सुरू होतो तो मे महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू असतो. पावसाळी पर्यटनासाठी देशी पर्यटकांनी गोव्याला गेल्या काही वर्षांमध्ये पसंती दिली आहे. मात्र सध्या कोविड संचारबंदी लागू असल्यामुळे हॉटेल्स बंद आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

Goa Under 23 Cricket: दिशांक मिस्कीनची एकाकी झुंज! नाबाद 97 धावांसह गोव्याला बिहारविरुद्ध विजयाची संधी

Ranji Trophy 2026: 40 पैकी 38 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या; गोव्याच्या फलंदाजांची रणजीत दयनीय अवस्था

Asian Para Games 2026: भारताच्या गोल्डन गर्लची कमाल! शीतल देवीने अवघ्या काही तासांत जिंकली दोन सुवर्णपदके; एशियन पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

SCROLL FOR NEXT