Goa GST deduction security guards Dainik Gomantak
गोवा

Goa: "सुरक्षारक्षकांच्या वेतनावरील 18% जीएसटी बंद करणार" CM प्रमोद सावंतांचे विधानसभेत आश्‍‍वासन

Goa GST deduction security guards: गोवा मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे नेमण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांच्या वेतनातून १८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) कपात करणे लवकरच बंद केले जाईल, असं मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले.

Sameer Amunekar

पणजी : गोवा मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे नेमण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांच्या वेतनातून १८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) कपात करणे लवकरच बंद केले जाईल, असे आश्‍‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले.

राज्याचे वित्त खाते, वस्तू व सेवा कर खाते आणि महामंडळ यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी शून्य तासाला हा विषय उपस्थित केला होता. ते म्हणाले की, सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे लोक आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील असतात.

मुळातच त्यांना वेतन कमी आहे आणि त्यातूनही १८ टक्के जीएसटी वजा केल्यास त्यांनी आपला प्रपंच कसा करावा?. त्‍यामुळे त्‍यांना जीएसटी जाळ्याच्या बाहेर ठेवण्याचा विचार सरकारने करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

Viral Video: ‘हॅप्पी अंडस पंडस...’! स्वातंत्र्य दिनाची तयारी करणाऱ्या चिमुकल्याचा मजेदार व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही हसून-हसून व्हाल लोटपोट

Cristiano Ronaldo In Goa: फुटबॉल चाहत्यांची स्वप्नपूर्ती! ख्रिस्तियानो रोनाल्डो गोव्यात खेळणार

Goa Today Live News: बनावट कागदपत्रे प्रकरणी फोंड्याचे नगरसेवक शिवानंद सावंत यांना पुन्हा अटक!

हमारी विरासत, आने वाली नस्लों को राह दिखाएंगी। मुख्यमंत्री प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांच्या मार्गावर?

SCROLL FOR NEXT