Goa CM Dr. Pramod Sawant Press In New Delhi Dainik Gomantak
गोवा

Goa CM On AAP: मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आपमध्ये जुंपली, दिल्लीत केजरीवालना विचारला जाब

Goa CM On AAP:केजरीवालांवर टीका करण्‍यासाठीच मुख्‍यमंत्री दिल्लीला गेले आहेत का? : वाल्मिकी नाईक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa CM On AAP

स्वाती मालीवाल प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्‍यावर टीका करत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिल्ली गाजवली. तर, मुख्यमंत्री सावंत गोव्यातील मुद्यांवर गप्प का, असा जाब आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी पत्रकार परिषदेत विचारला.

मुख्यमंत्र्यांनी ‘आप’ला महिलांविरोधी पक्ष असे संबोधले, आता त्‍यांनी या विषयावर मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यासह पत्रकार परिषद घ्‍यावी, असे आव्‍हान त्‍यांनी दिले.

मुख्यमंत्री गेले तीन दिवस लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात भाजप उमेदवारांचा दिल्लीत प्रचार करत आहेत. त्यांनी आज तेथील भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेत थेट केजरीवाल यांना लक्ष्‍य केले. मुख्यमंत्री म्हणाले, मी गेले तीन दिवस दिल्लीत फिरत आहे.

जनता, माता-भगिनींशी संवाद साधत आहे. मला सारे जण एकच प्रश्‍‍न विचारत आहेत की, स्वाती मालीवाल अत्याचार प्रकरणावर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल गप्प का?, जामिनावर सध्या प्रचारासाठी बाहेर असलेल्या केजरीवालांचे हे मौन पुरेसे बोलके आहे असे मला वाटते.

त्यांनी या प्रकरणावर काहीच न बोलणे हे लज्जास्‍पद आहे. आम आदमी पक्ष आता दिल्लीविरोधी आणि महिलांविरोधी पक्ष बनला आहे.

त्‍यावर बोलताना वाल्मिकी नाईक म्‍हणाले की, दिल्लीतील जनता गेली दहा वर्षे केजरीवाल यांच्यावर विश्‍‍वास ठेवून ‘आप’ला ७० पैकी ६२ ते ६७ जागा देत आहे. ‘आप’ला महिलाविरोधी संबोधणारे मुख्यमंत्री सावंत मणिपूरमध्ये कारगिल हिरोच्या पत्नीवर अत्याचार झाला त्यावेळी गप्प का राहिले?

ऑलिंपिक विजेत्या महिला कुस्तीपटूंवर अत्याचार झाला, त्यावेळी गप्प का होते? कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात हात घेऊन त्याला मत दिले तर मला शक्ती मिळेल, अशा प्रज्वल रेवण्णाबाबत मुख्यमंत्री काहीच का बोलले नाहीत? असे विविध प्रश्‍‍न उपस्‍थित केले.

निष्पक्ष चौकशी व्हावी

आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाणप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी प्रथमच थेट भाष्य केले आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन निवाडा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेचेही दोन पैलू असल्याचे त्यांनी नमूद केले.

केजरीवालांवर टीका करण्‍यासाठीच मुख्‍यमंत्री दिल्लीला गेले आहेत का? : वाल्मिकी नाईक

मुख्यमंत्री सावंत दिल्लीतील प्रचारात गोमंतकीय जनतेची अब्रू काढत आहेत. त्यांच्याकडे प्रचारात मांडण्यासारखा एकही मुद्दा नाही. ते केवळ आम आदमी पक्ष आणि केजरीवर यांच्यावरच टीका करत आहेत. सावंत दिल्लीत विचारतात, केजरीवाल यांनी पुन्हा तुरुंगात जावे की नाही? त्यावर समोर उपस्थित काहीच उत्तर देत नाहीत.

यावरून त्यांनी काय ते समजायला हवे. गोव्‍यात एवढ्या समस्‍या आहेत, त्‍यावर न बोलता मुख्‍यमंत्री सावंत फक्त केजरीवाल यांना शिव्या देण्यासाठीच दिल्लीत गेले आहेत की काय? असा सवाल वाल्मिकी नाईक यांनी उपस्‍थित केला.

दिल्लीतील जनतेेने घेतलाय योग्‍य बोध : मुख्‍यमंत्री सावंत

स्वाती मालीवाल या माजी खासदार असून वीस वर्षे केजरीवाल यांच्या सहकारी आहेत. त्यांच्यावरच मुख्यमंत्री केजरीवाल यांच्‍या निवासस्थानी अत्याचार होतो. मुख्यमंत्र्यांचे सहकारी विभवकुमार यांना मुख्यमंत्र्यांच्याच निवासस्थानी लपवून ठेवले जाते.

केजरीवाल यांचे एक सहकारी संजय सिंह पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अशी घटना झाल्याचे मान्य करतात आणि तीन दिवसांत कारवाईचे आश्‍‍वासन देतात. तरीही पुढे काही होत नाही. यावरून जनता जो काही बोध घ्यायचा आहे तो घेत आहे, असा टोला मुख्यमंत्री सावंत यांनी लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ''टीम इंडियाला हलक्यात घेऊ नका, ते सहज हरवू शकतात", शोएब अख्तर घाबरला, पाकिस्तानला दिला 'हा' इशारा

Goa Crime: "कुत्र्यांना मारू नका" म्हटल्याने कॉन्स्टेबलची तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची टाळाटाळ?

Suryakumar Yadav: 21 कोटींचं आलिशान घर, लक्झरी कार कलेक्शन...'सूर्या दादा'ची Net Worth ऐकून चक्रावून जाल

IND vs PAK: भारतानं पाकिस्तानविरूध्दच्या मॅचवर बहिष्कार टाकला तर? गुणतालिकेत उलथापालथ निश्चित, पाकचा राहील वरचष्मा

Viral Video: 'मनोहर पर्रीकर फिरायचे तसे तुम्हीही फिरत जा'; पुण्यात पाहणी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना महिलेचा सल्ला Watch Video

SCROLL FOR NEXT