Netravali Poaching Case: कदंब कर्मचारी श्रीकांतच्‍या घरातून बंदूक जप्‍त

Netravali Poaching Case: जप्‍त करण्‍यात आलेल्‍या बंदुकीचा परवाना संशयित श्रीकांत याचे दिवंगत वडील सुकडो गावकर यांच्‍या नावावर होता.
Netravali-Wildlife-Sanctuary
Netravali-Wildlife-Sanctuary

Netravali Poaching Case

नेत्रावळी अभयारण्‍यातील साळजिणी येथील जंगल भागात शिकारीला गेलेल्‍या त्‍या 16 कर्मचाऱ्यांच्‍या कृत्‍यावर कदंब महामंडळाकडून पांघरूण घालण्‍याचा प्रयत्‍न होत असला तरी वन खात्‍याने हे प्रकरण लावून धरले आहे.

या प्रकरणातील एक संशयित श्रीकांत सुकडो गावकर याच्‍या कुमारी-सांगे येथील घरातून वन खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी एक 12 बोअर बंदूक जप्‍त केली आहे. त्‍याने बेकायदा बंदूक बाळगल्‍याप्रकरणी सांगे पोलिसांत तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.

14 मे रोजी हा कथित शिकारीचा प्रयत्‍न झाला होता. त्‍यावेळी वनाधिकाऱ्यांनी पकडलेल्‍या साहित्‍यात 12 बोअर बंदुकीची पाच जिवंत काडतुसे सापडली होती. त्‍यानंतर गावकर याच्‍या घरावर छापा टाकला असता तिथे 12 बोअरची बंदूक तसेच बंदूक साफ करण्‍याच्‍या तीन सळ्‍या, दोन ब्रश आणि एक नोझल असे साहित्‍य सापडले होते.

या प्रकरणी नेत्रावळी अभयारण्‍य विभागाचे वनाधिकारी देविदास वेळीप यांनी सांगे पोलिसांत तक्रार दिली आहे. सांगेचे पोलिस उपनिरीक्षक ए. वेळीप हे अधिक तपास करत आहेत.

Netravali-Wildlife-Sanctuary
Shreya Dhragalkar Arrested: श्रेयाला कुंकळ्‍ळीत जामीन, डिचोली पोलिसांकडून अटक

शिकारीसाठी याच बंदुकीचा वापर?

जप्‍त करण्‍यात आलेल्‍या बंदुकीचा परवाना संशयित श्रीकांत याचे दिवंगत वडील सुकडो गावकर यांच्‍या नावावर होता. त्‍यांचे निधन झाल्‍यानंतर ही बंदूक सरकारी दफ्‍तरी जमा करणे आवश्‍‍यक होते.

मात्र तसे न करता ती तशीच बेकायदेशीर घरात ठेवल्‍याबद्दल श्रीकांत गावकर याच्‍याविरोधात शस्‍त्रास्‍त्र कायद्याच्‍या कलम 3 व 25 खाली गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. साळजिणी येथे शिकारीला गेले असता संशयितांनी याच बंदुकीचा वापर केला असावा असा संशय आहे. ही बंदूक जप्‍त केल्‍याने आता या प्रकरणाला वेगळे मिळू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com