Goa News: गोव्यात लैंगिक कारणासाठी मानवी तस्करीचे प्रमाण वाढत आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात प्रामुख्याने नोकरीचे आमिष देऊन तरुण, तरुणींची तस्करी केली जाते. अशा प्रकारांना महिला अधिक बळी पडतात. याच पार्श्वभूमीवर आज (23 ऑक्टोबर) राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात वाढत असणाऱ्या मानव तस्करीच्या घटनांवर भाष्य केले. मुख्यमंत्र्यांनी मानव तस्करांना थेट इशारा दिला.
महिलांना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या तस्करांना राज्यात थारा नाही, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री सावंत एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आमदार दिलायला लोबो देखील उपस्थित होत्या. काही दिवसांपूर्वी, पणजी येथे मानवी तस्करीविरोधी युनिटने गुजरातमधील व्यापारी अनंत कुमारला अटक केली होती. एका महिलेवर बलात्कार करुन तिची वेश्याव्यवसायासाठी तस्करी केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली होती.
राज्यात लैंगिक तस्करीच्या घटना सातत्याने समोर येताय़ेत. आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. गोव्यात महिलांना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या तस्करांना थारा नाही. गोव्यात लैंगिक कारणासाठी मानवी तस्करी खपवून घेतली जाणार नाही, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. लैंगिक तस्करीची 93 टक्के प्रकरणे राज्याबाहेरील असल्यामुळे दिल्ली भेटीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी यापूर्वी सांगितले होते.
गोवा (Goa) हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणात मानवी तस्करी होते. यासाठी देशभरातील दलाल सक्रिय असून ग्राहकांच्या मागणीनुसार देश-विदेशातील मुली ते येथे पुरवतात, हे अनेकवेळेला पोलिसांच्या छाप्यांतून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, पर्यटनवाढीसाठी आपण आपल्या लेकी-बाळींना धोक्यात घालून महसूल कमवू नये. याचा विचार पर्यटन धोरणाच्या अनुषंगाने व्हावा. राज्यात लैंगिक तस्करी बंद होण्यासाठी सर्व यंत्रणांनी सक्रियपणे कार्य करणे गरजेचे आहे. जो व्यक्ती आपल्या वासनेसाठी अशाप्रकारे महिलांची मागणी करणे मोठा गुन्हा आहे; परंतु अशा व्यक्तींवर कारवाई होताना दिसत नसल्याची खंत गोमंतकीयांकडून व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.