Goa CM Pramod Sawant And Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'CM सावंत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतायेत', जीत गेल्यास दुसरा उमेदवार तयार - मगो

MGP Goa: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमात मांद्रेची जागा २०२७ मध्ये भाजप नक्की जिंकणार, असे जाहीर वक्तव्य केले.

Pramod Yadav

मांद्रे: 'येत्या विधानसभेत मांद्रेची जागा भारतीय जनता पक्ष नक्की जिंकणार', असे जाहीर वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केल्याने युतीत असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे टेन्शन वाढले आहे. प्रसंगी मांद्रेतून लढण्याची इच्छा काही दिवसांपूर्वी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांच्या वक्तव्याने सावध झालेल्या मगोने पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा कालावधी बाकी आहे. दरम्यान, राज्यात मात्र त्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्याचे दिसत आहे. भाजपचे राष्ट्रीय नेत्यांनी गेल्या दोन आठवड्यात गोव्याचा दौरा करत विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आजी - माजी आमदार येत्या निवडणुकीसाठी पुन्हा इच्छुक असल्याने प्रत्येकाने दावेदारी सांगण्यास आत्तापासूनच सुरुवात केलीय. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमात मांद्रेची जागा २०२७ मध्ये भाजप नक्की जिंकणार, असे जाहीर वक्तव्य केले.

खुद्द मुख्यमंत्री सावंत यांनी जाहीर वक्तव्य केल्याने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सावध झाला आहे. मांद्रे, पेडणे कार्यकारिणीकडून याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. आमदार जीत आरोलकर भाजपमध्ये गेल्यास मांद्रेत मगोचा दुसरा उमेदवार तयार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले. मांद्रेची जागा मगोकडे असताना २०२७ मध्ये विधानसभेसाठी येथे भाजप उमेदवार देणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री मगोचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतायेत, असा आरोप देखील कार्यकारिणीने केला.

गेल्या काही दिवसांपूर्वी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी गरज भासल्यास मांद्रेतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत मांद्रेतील नागरिकांनी लोबोंना कळंगुटमध्येच लक्ष देण्याचा सल्ला दिला होता. भाजपसोबत सरकारमध्ये असलेल्या मगोला आगामी निवडणुकीत भाजप सोबत घेणार का? याबाबत साशंकता आहे. दरम्यान, दोन आमदार असलेल्या मगोने सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT