IFFI Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa 2023: केवळ 'टच ऑफ' राहिला, CM सावंत म्हणतात इफ्फीचे 99 टक्के कामे पूर्ण

स्थानिक कलाकार आणि कलाकृतींना इफ्फीत स्थान मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'गोवन' विभागात 7 चित्रपटांची घोषणा केली.

गोमन्तक डिजिटल टीम

IFFI Goa 2023: राज्यात 20 नोव्हेंबर पासून सुरू होत असलेल्या भारताच्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) 99 टक्के कामे पूर्ण झाले असून केवळ 'टच ऑफ' राहिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (गुरुवारी) दिली.

स्थानिक कलाकार आणि कलाकृतींना इफ्फीत स्थान मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'गोवन' विभागात 7 चित्रपटांची घोषणा केली. यावेळी गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्षा आमदार दिलायला लोबो आणि सीईओ अंकिता शर्मा उपस्थित होत्या.

राज्यात 'इफ्फी'च्या रूपाने जगातला निवडक मोठ्या चित्रपट महोत्सवाचे आयोजन होते. हा आशिया खंडातील सर्वात जुना महोत्सव आहे.

यासाठी सर्व कामे पूर्णत्वाकडे आली असून स्मार्ट सिटी, सार्वजनिक बांधकाम खात्यासह 'ईएसजी' ची सर्व कामे पूर्ण होत आली आहेत. यंदा या महोत्सवात 198 आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रदर्शन होईल.

ईएसजीच्या वतीने तीन ठिकाणी ओपन एयर'

चित्रपटांचे प्रदर्शन होईल. यात मिरामार, हणजूण पार्किंग आणि रवींद्र भवन मडगाव या ठिकाणांचा समावेश आहे. यंदा 'सर्वांसाठी इफ्फी या घोषणेनुसार सर्व लोकांना 'इफ्फी' अनुभवता यावी यासाठी ईएसजी च्या वतीने विशेष प्रयत्न केले आहेत.

कला अकादमीमध्ये यंदा चित्रपटांचे प्रदर्शन होणार नसले तरी मास्टर क्लास आणि इतर चर्चा, संवाद सत्रे होतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: मोबाईलवर नको, मैदानावर खेळा

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

Wild Vegetables: पावसाळ्यातील किमया! गोव्यातील चविष्ट रानभाज्या..

SCROLL FOR NEXT