Goa CM Pramod Sawant said Plane will land at Mop Airport before 15 August 2022 
गोवा

पुढील 5 वर्षात पेडणे तालुका प्रथम क्रमांकावर: मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची ग्वाही

गोमन्तक वृत्तसेवा

पेडणे: मोप विमानतळावर 15 ऑगस्ट 2022 पूर्वी विमान ‘लॅंडिंग’ करेल, तर तुये इलेक्ट्रॉनिक सिटीचे काम एका वर्षात मार्गी लागणार आहे. आमदार दयानंद सोपटे  हे संघटक कौशल्य आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत डिचोली नगरपालिका निवडणुकीत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मांद्रे - पेडण्यातील रोजगारीचा प्रश्न वर्षभरात सुटेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री  डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. आमदार दयानंद सोपटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार सुभाष शिरोडकर, अनिल होबळे, माजी मंत्री दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर आदी उपस्थित होते. अभासू वृत्ती सुसंस्कृत संघटन कौशल्याने दयानंद सोपटे यांनी कार्य सुलभ केले आहे. सोपटे यांचे काम भाजपात खूप मोठे आहे. कठीण प्रसंगातून त्यांनी कार्य केले. आमदार सोपटे यांनीच पर्यटनाला दिशा दिलेली आहे. केंद्राचा निधी गोवा विकास महामंडळ यांना अधिक मिळणार आहे. पर्यटनाला वाव देण्यासाठी हा निधी वापरला जाईल. त्यात  पेडणे तालुक्यात अधिक वापरला जाईल. पुढच्या पाच वर्षात पेडणे तालुका प्रथम क्रमांकावर असेल.15 ऑगस्ट 2022 पर्यंत मोप प्रकल्प पूर्ण करणार आहे. तसेच तुये आयटी प्रकल्पाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

रोजगाराच्या संधी तुये आयटीमधून मिळणार. 2022 पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. मांद्रेचे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. तुये हॉस्पिटल पुढच्या वर्षी सुरू होईल. आयटी प्रकल्प मार्गी लागणार आहे.30 एलडी पाणी प्रकल्प, उपविभागीय वीज विभाग कार्यरत होणार आहे. मांद्रेत निवडणुकांना अजून 10 महिने आहेत. 10 हजार नोकऱ्या पुढच्या 10 महिन्यांत भरणार आहे. गोवा मुक्तीची 60 वर्षे साजरा करत आहे.  त्यात सर्वांनी सहभागी व्हावी. गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सांगितले, की कामाच्या पद्धतीतून सोपटे यांनी आपली प्रतिमा निर्माण केली आहे. विरोधी पक्षात राहून विकास करता येत नाही, विकासासाठी आम्ही भाजपात गेलो तो निर्णय योग्य आहे. पुढच्याही  निवडणुकीत सोपटे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील.

आमदार दयानंद सोपटे म्हणाले, की मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या सहकार्याने गोवा विकास महामंडळ प्राप्त झाले. त्यातून विकासाला गती देता आली. भगवती सप्टेश्वराच्या कृपेने मला आमदार म्हणून जनसमुदाय विजयी करतात आणि माझ्या उत्सवात उपस्थित राहून मला उपकृत करतात. ही जादू कार्यकर्त्यांची आहे. राजकारणात पैसे असलेला टिकतो असे म्हणतात. मात्र, आपण गरीब सामान्य आमदार असूनही मला चारवेळा जनता निवडून देते. कोट्यधिशांना मतदार जवळ घेत नाही. आपण एक वर्षाचा असताना वडील गेले. त्याकाळात मोठ्या भावाने सावरले. स्टेजवर मला आणण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी संधी दिली. त्यांना मी आयुष्यभर विसरणार नाही.

भाजप गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले, की मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याच नेतृत्वाखाली  आमदार सोपटे यांनी कार्य सुरू केले आहे. आगामी काळात तेच आमदार बनतील. आमदार सोपटे हे संस्कारमय असल्याने ते लोकप्रित ठरले आणि विकासाला गती दिली. वाढदिवस हे निमित्त आहे. त्यांच्या प्रेमापोटी कोरोनावर मात करत त्यांच्या चाहत्यांनी मोठी उपस्थिती लावली. जीवाची पर्वा न करता आमदार सोपटे यांनी कोविड काळातही आपले कार्य चालूच ठेवले.

खासदार विनय तेंडुलकर यांनी सांगितले, की दयानंद सोपटे हे सत्कार्य करणारे नेते आहेत. भाजप सत्तेवर आल्याने विकास झाला आणि आमदार सोपटे भाजपचे आमदार झाले म्हणून विकास होत आहे. जनहित लक्षात घेऊन ते कार्य करत आहेत.  विकासाची गंगा सोपटे यांच्याकडून वाहते आहे.
आमदार सुभाष शिरोडकर म्हणाले, की सोपटे यांचा वाढदिवस साजरा करण्यास नसून तर कोरोनाचे नियम पाळून वर्षभर विकासाची कामे केली त्याचा हा उत्सव साजरा करण्यासाठी आहे. आमदार सोपटे यांच्या मागे समाधान आहे ते विकासाच्या कामाचे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सुंदर अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचा फायदा 365 दिवसांनी कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या घरापर्यंत पोचवावा.

महिला मोर्चाच्या अध्यक्ष दीपा तळकर म्हणाल्या, की आमदार कसा असावा हे सोपटे यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे. लॉकडाऊन काळात जी मदत केली त्याची प्रचिती आज येत आहे. यावेळी सुदेश सावंत, श्रुती कोनाडकर आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. भाजप मंडळ अध्यक्ष मधू परब यांनी स्वागत व प्रा. विठोबा बगळी यांनी सूत्रसंचालन केले. संकेत नाईक यांनी आमदार सोपटे यांची प्रतिमा साकारल्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT