Kala Academy | Pramod Sawant And Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: कला अकादमी, मंत्री गावडेंच्या राजीनाम्यांचा प्रश्न विचारताच CM सावंतांनी पत्रकार परिषदच गुंडाळली

Goa Politics: मंत्रिमंडळ फेरबदलाच्या या हालचाली प्रदेश पातळीवर सुरू असतानाच मंत्री गोविंद गावडे यांच्या विषयीचा कलाकारांचा रोष उफाळून आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Politics

कला अकादमी नूतनीकरण प्रकरणात कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी राजीनामा द्यावा, या राज्यभरातील कलाकारांच्या मागणीवर बोलण्यास मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज दुपारी नकार दिला. पुन्हा कधीतरी या विषयावर बोलू, असे म्हणत त्यांनी हा विषय गुंडाळला.

पर्वरी येथे मंत्रालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी थेट प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी यावर पुन्हा कधीतरी बोलू, असे मोघम उत्तर दिले. याविषयी पुन्हा विचारणा केल्यावर त्यांनी पत्रकार परिषदच गुंडाळली.

राज्यभरातील कलाकारांनी पणजीत जाहीर सभा घेऊन पंधरा दिवसांत कला अकादमी पूर्णपणे खुली करा अन्यथा पाय उतार व्हा, असा इशारा मंत्री गोविंद गावडे यांना दिला आहे. विशेष म्हणजे त्या सभेला गावडे हेही उपस्थित होते. त्यांनी या विषयावर जाहीर भाष्य करणे टाळले आहे. त्या पाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांनीही या विषयावर मौन बाळगणे पसंत केले आहे.

या विषयावरून सरकार पुरते कोंडीत सापडले आहे. सर्व बाजूंनी नेटकरी सरकारचे वस्त्रहरण करत आहेत. त्यामुळे या सर्व घटनांची नोंद आता भाजपने प्रदेश पातळीवर घेतलेली आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या विषयावर आपण मुख्यमंत्र्यांशी जरूर बोलू, असे जाहीरपणे सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात अनपेक्षित अशा पराभवास सामोरे जावे लागल्यानंतर भाजप पक्ष संघटनेत आता मंत्रिमंडळ फेरबदल केला पाहिजे, असा विचार बळावला आहे. खासगीत अनेक नेते मंत्रिमंडळ बदल व्हायला हवा, असे मत व्यक्त करू लागले आहेत.

काही आमदारांचे समर्थकही आपल्या आमदाराला मंत्री करावे, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊ लागले आहेत. सावर्डेचे आमदार आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांच्या समर्थक पंच, सरपंचांनी मंत्रिपदासाठी मुख्यमंत्र्यांची जाहीरपणे भेट घेतली आहे.

मंत्रिमंडळ फेरबदलाच्या या हालचाली प्रदेश पातळीवर सुरू असतानाच मंत्री गोविंद गावडे यांच्या विषयीचा कलाकारांचा रोष उफाळून आला आहे. सध्या विविध समाज माध्यमांवर कला अकादमी प्रकरणावरून गोविंद गावडे आणि सरकारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahavatar Narasimha: महावतार नरसिंहचा दमदार जलवा! 17 दिवसांत 213 कोटींचा टप्पा; 'छावा'च्या यादीत झाला समावेश

Comunidade Land Bill: '..अन्यथा न्यायालयात जाऊ'! कोमुनिदाद विधेयक बेकायदेशीर असल्याचा दावा; संघटनांचा विरोध

Goa Crime: तलवार-लाठ्यांनी हल्ला, नंतर गाडीवर गोळीबार; गोव्यात भल्या पहाटे तरुणांवर प्राणघातक हल्ला

Goa Live News: नार्वेत जत्रेचा उत्साह, आमदार प्रेमेंद्र शेट यांनी घेतले दर्शन

Goa NABARD Loan: ‘नाबार्ड’कडून गोव्याने घेतले 1368 कोटींचे कर्ज! लोकसभेत झाला खुलासा; सीतारामन यांनी केली आकडेवारी सादर

SCROLL FOR NEXT