Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa CM In New Delhi: महाराष्ट्रानंतर दिल्ली गाजवतायेत गोव्याचे मुख्यमंत्री; रॅली, प्रचार सभांचा धडाका

Delhi Election 2025: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी दिल्लीत भाजप सरकार येईल, असा दावा केला.

Pramod Yadav

Delhi Election 2025

नवी दिल्ली: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गेल्या तीन दिवसांपासून नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षासाठी प्रचार करतायेत. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ०५ तारखेला मतदान होत आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी दिल्लीत देखील भाजप सरकार येईल असा दावा केला आहे. प्रचार सभा, रॅलीत सहभागी होणारे मुख्यमंत्री सावंत महाराष्ट्रानंतर राजधानी दिल्ली देखील गाजवताना दिसत आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत सुलतानपूरी मतदारसंघात करम सिंह कर्मा यांच्या प्रचार रॅलीत सहभाग घेतला. याशिवाय त्यांनी रिठाला येथे कुलवंत राणा यांच्यासाठी यांच्यासाठी आयोजित रॅलीत सहभाग घेतला. मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिल्लीत भाजप सरकार येईल, असा दावा केला.

"मी गोव्यात गेल्या तीन दिवसांपासून आहे. लोकांशी संवाद साधतोय, सामान्य लोकांना भेटतोय. गेल्या दहा वर्षात आम आदमीच्या सरकारने दिल्लीत काहीच विकास केला नाही. त्यामुळे राज्यात भाजपचे सरकार यावे अशी लोकांचीच इच्छा आहे. आणि दिल्लीत भाजप बहुमताने जिंकणार आहे, असा मला विश्वास आहे", असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

"दिल्लीत डबल इंजिन सरकार यावे अशी लोकांचीच इच्छा आहे. डबल इंजिन सरकार असलेल्या राज्यात ज्याप्रमाणे विकास झाला आहे ते पाहता सर्वांची तशीच इच्छा आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री तुरुंगात होते. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. अशा लोकांना दिल्लीची जनता पुन्हा निवडून देणार नाही", असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दिल्लीच्या ७० विधानसभा जागांसाठी येत्या ०५ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. तर ०८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. गेल्या दहा वर्षापासून दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे सरकार आहे. त्यापूर्वी १५ वर्षे शिला दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार सत्तेत होते. तर, भाजप गेल्या २७ वर्षापासून दिल्लीत सत्ता मिळवू शकला नाही. त्यामुळे यावेळी भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT