Goa CM Pramod Sawant Pramod Sawant X Handle
गोवा

Goa Education: 'पंचज्ञान इंद्रिय मॉडेल'साठी गोवा सरकार प्रयत्नशील; CM सावंत म्हणाले, 'विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल शिक्षणाची गरज'

Teacher's Day: कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात शुक्रवारी शिक्षण संचालनालयातर्फे आयोजित शिक्षकदिन कार्यक्रमात ते बोलत होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देऊन गरजेचे नाही. पुस्तकी ज्ञान देऊनच विद्यार्थी विकासीत होईल असेही नाही, तर त्यांना 'पंचज्ञान इंद्रिय मॉडेल' शिकवणे आवश्यक आहे. पृथ्वी (जमीन), आप (पाणी), तेज (अग्नी), वायू (हवा) आणि आकाश (अवकाश) ही जशी पंचमहाभूते आहेत, त्याच पद्धतीत डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा पंच इंद्रियांच्या माध्यमातून व्यावहारिक (प्रॅक्टिकल) शिक्षण शिकणे गरजेचे आहे. ते शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा सरकार काम करीत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात शुक्रवारी शिक्षण संचालनालयातर्फे आयोजित शिक्षकदिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते १० शिक्षकांना 'मुख्यमंत्री वसिष्ठ गुरु पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, गोवा एससीईआरटीच्या संचालक मेघना शेटगावकर, समग्र शिक्षाचे शंभू घाडी यांची उपस्थिती होती.

करिअर मार्गदर्शनाची गरज

लोलयेकर म्हणाले, शालेय स्तरावर करिअर मार्गदर्शनाची गरज आहे, त्याकडे शिक्षकांची नजर असावी. प्रत्येक वर्गात पहिला-दुसरा आलेल्यांची नावे माहीत असतात, पण शेवटी कोण आला त्याचे नाव माहीत असणे गरजेचे आहे. शेवट कोण आला आहे, त्यात कोणतीतरी व्यक्ती लपलेली असू शकते. त्याला वेगळ्या तन्हेचे शिक्षण हवे असेल, त्यादृष्टीने आम्ही ते देण्याचे काम करीत आहोत.

एनईपी आम्ही लागू केले, शिक्षक जोपर्यंत तयार होईल, तेव्हाच आपण क्षमताशील विद्यार्थी तयार करू शकू. शिक्षकांची मर्यादा वाढल्या पाहिजेत, त्या मर्यादा वाढतील. परंतु मोठ्या शहरांमध्ये शिक्षकांना मिळणारे व्यासपीठाप्रमाणे येथे ते उपलब्ध होत नाही. ते व्यासपीठ मिळवून देण्याचे काम आम्ही करीत आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वशिष्ठ गुरु पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादी

१) प्राथमिक गटात छाया बोकडे (विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक शाळा, विठ्ठलापूर-साखळी) व कमलाकर देसाई (सरकारी प्राथमिक शाळा, गावठण-पिळये-धारबांदोडा)

२) माध्यमिक गटात मंजिरी जोग (केशव सेवा साधना नारायण झांट्ये स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन), राजमोहन शेट्ये (विस्काऊंट ऑफ पेडणे हायस्कूल, नानेरवाडा), कालिदास सातार्डेकर (पीएमश्री कामिलो परेरा मेमोरियल सरकारी हायस्कूल, सडार-फॉडा), ममता पाटील (आनंदीबाई महानंदू नाईक हायस्कूल, करंझाळ - मडकई)

३) विद्यालय मुख्याध्यापक गटात गुरुदास पालकर (ज्ञानप्रसारक विद्यालय, म्हापसा), अरोरा डिसोझा (रोझरी हायस्कूल, नावेली)

४) उच्च माध्यमिक गटात सुनील शेट (दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालय, हेडलैंड सडा)

५) उच्च माध्यमिक मुख्याध्यापक गटात सिंथिया मारिया बोर्जेस (रामचंद्र महादेव साळगावकर उच्च माध्यमिक विद्यालय, कोंब-मडगाव) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोंयत कोळसो नाका' आंदोलनाला विरोधी पक्षांची एकजूट! आलेमाव, सरदेसाई अन् परबांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, 'कोळशाच्या मुद्यावर गप्प बसणारे आता...'

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

SCROLL FOR NEXT