Matoli vendors Goa Dainik Gomantak
गोवा

माटोळी विक्रेत्यांना 'सोपो' माफ, परप्रांतीय होलसेल विक्रेत्यांवर कठोर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

SOPO cancellation Goa: विधानसभा अधिवेशनात स्थानिक फुलविक्रेते आणि गणेश चतुर्थीसाठी माटोळी साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांच्या समस्यांवर जोरदार चर्चा झाली

Akshata Chhatre

पणजी: विधानसभा अधिवेशनात स्थानिक फुलविक्रेते आणि गणेश चतुर्थीसाठी माटोळी साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांच्या समस्यांवर जोरदार चर्चा झाली. आमदार वीरेश बोरकर आणि आमदार विजय सरदेसाई यांनी हे मुद्दे उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या विक्रेत्यांना दिलासा देणारे मोठे आश्वासन दिले.

होलसेल दरात फुले विकणाऱ्यांवर कठोर कारवाई

आमदार वीरेश बोरकर यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा मांडताना सांगितले की, गोव्यात, विशेषतः म्हापसा बाजारात, स्थानिक महिला फुलविक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. त्यांना रस्त्याच्या कडेला फुले विकण्यापासून रोखले जात असून, त्यांच्या वस्तू जप्त केल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. यामुळे पारंपरिक फुलविक्री करणाऱ्या गोवेकरांच्या उपजीविकेवर परिणाम होतोय.

बोरकर यांनी सरकारला या स्थानिक विक्रेत्यांना संरक्षण देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना, स्थानिक विक्रेत्यांना नक्कीच न्याय मिळेल, असे आश्वासन दिले. तसेच, परराज्यातून येऊन गोव्यात होलसेल दरात फुले विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

गणेश चतुर्थीच्या माटोळी विक्रेत्यांना दिलासा

आमदार विजय सरदेसाई यांनी गणेश चतुर्थीच्या माटोळी विक्रेत्यांचा मुद्दा उपस्थित केला. 'मुख्यमंत्री आपला अर्थसंकल्प माटोळीसारखा असल्याचे सांगतात, तर त्यांनी चतुर्थीची माटोळी स्वयंपूर्ण करण्यावर भर द्यावा,' असे मत त्यांनी मांडले. चतुर्थीपूर्वी स्थानिक पातळीवर भाजीपाला आणि माटोळी साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांसाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.

पारंपरिक माटोळी विक्रेत्यांवर लावण्यात येणाऱ्या 'सोपो' (स्थानिक कर) वरूनही त्यांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मोठी घोषणा केली. पारंपरिक माटोळी विक्रेत्यांना 'सोपो' कर माफ केला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, पंचायत आणि नगरपालिकांना स्थानिक विक्रेत्यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT