Assagao House Demolition Dainik Gomantak
गोवा

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Assagao Demolition Case: पूजा शर्माने अटकपूर्व जमीनासाठी केलेल्या अर्जावर आज प्रधान सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

Pramod Yadav

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबियांच्या घराची मोडतोड केल्याप्रकरणात मुख्य संशयित पूजा शर्माच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरु आहे.

या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार लोबो दाम्पत्याच्या हस्तेक्षेपाचा उल्लेख पूजा शर्माच्या वकिलाने युक्तीवादात केला. पूजाच्या जामीन अर्जावर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा शर्माने अटकपूर्व जमीनासाठी केलेल्या अर्जावर आज प्रधान सत्र न्यायालयात सुनावणी झाली. पूजा शर्माच्या वतीने वकील सुरेंद्र देसाई यांनी युक्तीवाद केला. युक्तीवादात देसाई यांनी आसगाव घर मोडतोड प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा उल्लेख केला. तसेच तपास यंत्रणा स्वतंत्रपणे तपास करत नसल्याचेही ते म्हणाले.

देसाई यांनी प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार लोबो दाम्पत्याच्या हस्तेक्षेपाचा उल्लेख केला. दरम्यान, सुनावणी अपूर्ण राहिल्याने ती सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. युक्तिवाद आज संपल्याने सरकारी वकील सोमवारी (दि.08) रोजी बाजू मांडतील.

आत्तापर्यंत काय झालं?

आसगाव घर मोडतोड प्रकरणात आत्तापर्यंत विविध घडामोडी घडल्या. पोलिसांनी या प्रकरणात रिअल इस्टेट एजंट, बाऊन्सर्स, जेसीबी चालक आणि वाहन मालकाला अटक केली होती. तसेच, हणजूण पोलिस स्थानकाच्या तीन पोलिसांना निलंबित केले होते. तसेच, पोलिस महासंचालकांच्या निलंबनाची मागणी झाली.

दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सशर्त जामीन देण्यात आला आहे. तर, पोलिस महासंचालकांचे निलंबन अटळ असल्याचे सांगितले जात आहे. आगरवाडेकर कुटुंबियांनी तक्रार मागे घेण्यास तयारी दर्शवल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यासाठी विमान प्रवास महागला! नाताळच्या काळात तिकीट दरात मोठी वाढ; जयपूरहून येणाऱ्या पर्यटकांना बसतोय सर्वाधिक फटका

Goa Live News: गोवा पोलीस दलात पदोन्नती; अजय कृष्ण शर्मा बनले 'आयजीपी', तर राहुल गुप्ता यांचीही बढती

Goa ZP Election: मतदानाला सुट्टी मिळाली नाही! नागरिक संतप्त; कारवाई करण्याची होतेय मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; ‘माझे घर’चे गाजर

Shubhman Gill Dropped: '..या कारणासाठी शुभमनला वगळले'! अजित आगरकरने सांगितले धक्कादायक कारण; उपकर्णधारपदाची धुरा अक्षर पटेलकडे

SCROLL FOR NEXT