गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत Dainik Gomantak
गोवा

गोव्यासारख्या सुशिक्षित राज्याचे मुख्यमंत्री मुलींबद्दल काय बोलतात पाहा

"किशोरवयीन मुलांच्या पालकांनी त्यांचे मुलं गोवा बीच वर अंधाऱ्या रात्री काय करतात याचे परिक्षण केले पाहिजे, मुली रात्री समुद्रकिनाऱ्यावर काय करतात हे बघितले पाहिजे."

Priyanka Deshmukh

पणजी: गोव्यात कालपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यात सरकारला विरोधी पक्षनेत्यांनी अनेक प्रश्न विचारून निरूत्तर केले. गोव्यात गेल्या काही दिवसांपासून बलात्काराची अनेक प्रकरणे उघडीस येत आहेत. याच मुद्यावरून काल विधानसभा गाजली. (Goa CM Pramod Sawant makes horrific statement: Why teenagers roam on beaches at night)

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बलात्काराच्या मुद्यावरून विचित्र विधान सभागृहात केले. "किशोरवयीन मुलांच्या पालकांनी त्यांचे मुलं गोवा बीच वर अंधाऱ्या रात्री काय करतात याचे परिक्षण केले पाहिजे, मुली रात्री समुद्रकिनाऱ्यावर काय करतात हे बघितले पाहिजे" असे भंपक विधान गोव्यासारख्या आधूनिक आणि सुशिक्षित राज्याच्या मुख्यमंत्र्यानी केले.

गोवा विचाराने, संस्कृतीने आधुनिकतेने आणि एकंदरीत सगळ्याच बाबतीत पुढारलेले राज्य आहे. त्या राज्यातील तरूण रात्री बीचवर काय करतात? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारणे शोभत नाही. कारण ती तरूणाई आहे. ती बीचवर फिरणारच, हा युवक वर्ग आपलं आयुष्य भरभरून जगणारच. मुळात सावंत सरकारने या बीचवरच्या सुरक्षिततेसाठी काय प्रयत्न केले किंवा काय करायला पहिजे यावर भाष्य करणे अपेक्षित होते. बलात्कार का वाढतायेत समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेचे काय या विषयी बोलायचे सोडून त्यांनी गोव्यातील पालकांनाच विचित्र सल्ला दिल्याने कालची विधानसभा जोरदार गाजली.

जरी गोव्यातील तरूण किंवा तरूणी समुद्रकिनाऱ्यावर अपरात्री फिरत असतील तर ते त्यांच स्वातंत्र्य आहे. अपरात्री मुली बीचवर फिरतात म्हणून त्यांच्यावर अत्याचार कारावा या वृ्त्तीला खतपाणी घालण्याच काम सावंत सरकार करतयं की काय असा प्रश्न या ठीकाणी उपस्थित होतेय. दक्षिण गोव्यातील लोकप्रिय कोळवा समुद्रकिनार्‍यावर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपानंतर गोव्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षातील आमदारांनी केलेल्या आरोपांना सावंतांनी या प्रकारे उत्तर देवून १८व्या शतकातला काळ आठवायला भाग पाडले.

"14 वर्षाची मुलगी जेव्हा समुद्रकिनाऱ्यावर रात्र घालवते तेव्हा पालकांनीही आपल्या पाल्याचे परीक्षण केले पाहिजे, त्यांनीही काळजी घेतली पाहिजे"असे वक्तव्य राज्य विधानसभेच्या चालू पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केले.

दरम्यान, विरोधकांनी बलात्काराच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली. आमदार विजय सरदेसाई (MLA Vijai Sardesai) यांनी मंत्रीच बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी फोन करतात, असा आरोप केला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या वक्तव्याला आक्षेप घेतला आणि ‘एकतर त्या मंत्र्याचे नाव सांगा किंवा शब्द मागे घ्या’, अशी जोरदार मागणी केली. यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्यात बरीच ‘तू तू मै मै’ झाली. सरदेसाई यांनी शब्द मागे घेण्यास नकार दिल्याने वाद वाढत गेला.

विजयी सरदेसाई म्हणाले की, रात्री उशिरापर्यंत कोणीही राज्यात प्रवास करीत असेल तर ते गोव्यातील सुरक्षित वातावरण असेल ती गोव्याची ब्रँड प्रतिमा जगासमोर जाईल. ती गोव्याची ब्रँड इमेज असायला हवी. मुख्यमंत्री सावंतांनी गोमंतकीय पालकांना सल्ला देतांना विचार करायला हवा होता. त्याहिपेक्षा गोव्यातील तरूणींबद्दल असे विधान करतांना मुख्यमंत्र्यांनी जिभेवर ताबा ठेवायला हवा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video: "हटो हटो, डोन्ट डिस्टर्ब चेट्टा"! कॅप्टन सूर्याचा धमाल व्हिडीओ; नेटवर घालतोय धुमाकूळ

Goa Police Attack: दगडफेक अन् शस्त्राने वार! मध्य प्रदेशात गोवा पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सब-इन्स्पेक्टर अन् हवालदार जखमी

Kurdi: 1882 साली सोमेश्वराची घटना पोर्तुगीज दप्तरात नोंद आहे! साळावली धरणाच्या जलाशयाखाली बुडालेले 'कुर्डी' गाव

Bengaluru Airport Bomb Threat: "माझ्याकडे दोन बॉम्ब आहेत", बंगळुरु विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा; इंडिगो प्रवाशाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Chimbel Protest: चिंबलवासीयांचे महाआंदोलन! शेकडो ग्रामस्थ पोचले जुने गोवेत; अधिसूचना येईपर्यंत उपोषणाचा इशारा Video

SCROLL FOR NEXT