CM Pramod Sawant Hello Goenkar Program Dainik Gomantak
गोवा

पोर्तुगिजांनी उद्धवस्त केलेली मंदिरे, पाणी, ट्रॅफिक बाबत प्रश्न; 'हॅलो गोंयकार' कार्यक्रमात CM सावंत यांनी काय दिली उत्तरे?

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'हॅलो गोंयकार' कार्यक्रमाला आजपासून सुरूवात झाली.

Pramod Yadav

CM Pramod Sawant Hello Goenkar Program: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आजपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जनतेशी संवाद साधणार आहेत. त्या 'हॅलो गोंयकार' कार्यक्रमाला आजपासून सुरूवात झाली. राज्यातील जनतेने या कार्यक्रमाला उत्सफूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात राज्यातील जनतेने विविध प्रश्न विचारले. यामध्ये पोर्तुगिजांनी उद्धवस्त केलेली मंदिरे, पाणी, ट्रॅफिक यासारख्या मुद्यांवर लोकांनी प्रश्न विचारले. या प्रश्नांना मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तरे दिली.

मुख्यमंत्री लोकांशी संवाद साधत असलेल्या 'हॅलो गोंयकार' कार्यक्रमात केपे येथील एका रहिवाशाने फोन करत त्यांना राहण्यासाठी घर नसल्याने त्यांना घर मिळावे अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान आवास योजना आणि फ्लॅट खरेदीसाठी मिळणाऱ्या 2.50 लाख रूपये निधीची माहिती दिली. यासाठी संबधित विभागाकडे अर्ज करण्याची माहिती त्यांनी दिली.

मेरशी येथील एकाने फोन करत मुख्यमंत्री सावंत यांना पोर्तुगिजांनी उद्धवस्त केलेली मंदिराबाबत माहिती विचारली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री याबाबत काम सुरू असल्याचे सांगितले. यासाठी एक समिती तयार केली असून, समितीचा अहवाल लवकरच सार्वजनिक केला जाईल असे सावंत म्हणाले. एकच मोठं मंदिर निर्माण करण्याची योजना सरकारच्या विचाराधीन आहे. असे सावंत म्हणाले.

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत 2022-23 सालासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पोर्तुगिजांनी उद्धवस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल 20 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.

या कार्यक्रमात पेडणे येथील एका श्रोत्याने फोन करत गावात स्मशानभूमी नसल्याची समस्या सांगितली. त्यावर सावंत यांनी सरकारी जागा किंवा कोमुनिदादची जागा असल्याची खातरजमा करून अर्ज करण्यास सांगितले. याशिवाय याच तालुक्यातून एका व्यक्तीने फोन करत पाण्याची समस्या मांडली.

तसेच, राज्यातील पर्ये, सांता क्रुझ, कुंकळ्ळी, वास्को, साखळी, पणजी येथून लोकांनी कार्यक्रमात फोन करून त्यांच्या समस्या सांगितल्या. यावर मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तरे दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bisons In Goa: लाखेरेत गव्यांसह रानडुकरांचा धुमाकूळ! लोकांमध्ये भीतीचे वातावरण; बागायतीची मोठी नासधूस

Goa Coastal Plan: गोवा सागरी आराखड्यास होतोय विलंब! सल्लागाराची अद्याप नेमणूक नाही; डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम

Goa Politics: फोंड्यात राजकीय घडामोडींना वेग! 'भाजप'मध्ये वाढला अंतर्गत संघर्ष; रवींच्या वाढदिनाकडे सर्वांच्या नजरा

Elephant In Goa: बिथरलेला ‘ओंकार’ हत्ती गोव्यात दाखल! मोपाच्या जंगल भागात ठोकला मुक्काम; Watch Video

Goa Crime: गाडी मागे घेण्यावरून वाद पेटला, दगडफेक करून पर्यटकांना मारहाण; काचेच्या बाटलीने स्वतःलाही केले जखमी

SCROLL FOR NEXT