CM Pramod Sawant instructed all departments to prepare a vision document  Dainik Gomantak
गोवा

प्रत्येक खात्याने 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार करा : मुख्यमंत्री

स्वयंपूर्ण गोव्यासाठी 'सरकार तुमच्या दारी' पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्य सरकारच्या खात्यांचा सामान्य जनतेला फायदा व्हावा या उद्देशाने प्रत्येक खात्याने व्हिजन डॉक्युमेंट तयार करावेत, असे निर्देश संबंधित मंत्र्यांना दिले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्याचे लक्ष पूर्ण करण्यासाठी 'सरकार तुमच्या दारी' हा अभिनव उपक्रम पुन्हा सुरु करत असल्याचे ते म्हणाले. भाजप सहप्रभारी सी.टी. रवी यांच्या बैठक सत्रानंतर ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सरचिटणीस दामू नाईक उपस्थित होते. (CM Pramod Sawant instructed all department to prepare vision document)

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारचा कारभार स्वच्छ आणि लोकहिताचा करण्यासाठी पक्षाने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाचे पूर्तता करण्यासाठी सरकार पुढील पाच वर्षे कार्यरत असेल. सरकारने दहा कलमी कार्यक्रम राबवायचे ठरवले असून विविध क्षेत्रातील स्वयंपूर्णता हा त्यातीलच एक भाग असेल. मंत्र्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचतील आणि त्यांना त्या कशा मिळतील, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार योजना जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोचवून बेरोजगारी कमी करण्यासाठी हातभार लावला पाहिजे असे प्रमोद सावंत म्हणाले. यावेळी बोलताना तानावडे यांनी काल बुधवारी दिवसभर झालेल्या बैठकींचा तपशील दिला. यावेळी ते म्हणाले संघटन आणि सरकार एकत्र चालले पाहिजे.

लोकसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये दक्षिण आणि उत्तर लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकेल यासाठी पक्ष संघटन काम करत आहे अशी माहिती तानावडे यांनी यावेळी दिली.याशिवाय राज्यातील होऊ घातलेल्या पंचायत निवडणुका या पक्षीय पातळीवर होणार नसला तरी आमचे कार्यकर्ते विविध पंचायतींवर निवडून यावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असेही सदानंद शेट तानावडे म्हणाले.

विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अनेक आमदार प्रथमच नव्याने निवडून आले आहेत. याशिवाय काही मंत्री नव्याने मंत्री झाले आहेत. यासाठी पुण्याच्या रामभाऊ म्हाळगी संस्थेच्या वतीने राज्यातील सर्व आमदार आणि मंत्र्यांना तीन दिवसाच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती तानावडे यांनी दिली.

केंद्रातील भाजप सरकारला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. याशिवाय राज्यातील सरकारला दहा वर्ष पूर्ण होत असून अकराव्या वर्षात सरकार पदार्पण करत आहे. यासाठी भाजपच्या वतीने 30 मे ते 15 जून या 15 दिवसांच्या दरम्यान विशेष कार्यक्रम आयोजित केले असून प्रामुख्याने सुशासन आणि गरीब कल्याण हे या कार्यक्रमाचे उद्दिष्टे आहे,असे तानावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषकात जर्मनीचा नवा इतिहास; कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवत ब्राझीलचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT