osicon Goa 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Economy: ओसिकॉन 2025 परिषदेचे उद्घाटन; गोव्याच्या विकासात सागरी अर्थव्यवस्थेचा 'वाटा महत्वाचा', मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Marine Economy Goa: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ओसिकॉन २०२५ परिषदेचे उद्घाटन केले

Akshata Chhatre

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०२४७चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोव्यासारख्या सागरी प्रदेशात सागरी अर्थव्यवस्थेची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एनआयओ - सीएसआयआर आयोजित ओसिकॉन २०२५ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केले.

बुधवार (दि. ५ फेब्रुवारी) २०२५ रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आणि यावेळी मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत एनआयओचे संचालक डॉ. सुनीलकुमार सिंग, डॉ. जया कुमारी सिलम आणि परिषदेचे अध्यक्ष कुरियन एनपी उपस्थित होते. एनआयओ म्हणजेच राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेची स्थापना १९६६ मध्ये झाली होती. या संस्थेच्या माध्यमातून देशातील सागरी संशोधनाचे काम पहिले जाते. देशातील काही किनारी राज्यांच्या तुलनेत गोव्याला उत्तम समुद्र किनारपट्टी लाभली आहे.

सध्या राज्याला सागरी जैवविविधता, सागरी पर्यटन व मच्छीमारी यात नवीन संशोधन व नवनिर्मिती गरज आहे असे मुख्यमंत्री दरम्यान म्हणालेत आणि सागरी संशोधनात होणाऱ्या विकासामुळे गोव्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा हातभार लाभेल असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. गोव्यात मच्छिमारी आणि पर्यटन हे दोन महत्वाचे व्यवसाय आहेत आणि यामधून गोवा आर्थिक स्थिती नक्कीच सुधारू शकतो.

बुधवारी (दि. ५ फेब्रुवारी) रोजी उद्घाटन झालेली ओसिकॉन २०२५ ही परिषद आणखीन दोन दिवस चालणार आहे. गोवा सागरी राज्य असल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी सागरी संशोधन आणि राज्यातील हवामान संतूलीत ठेवण्यासाठी काही उपाययोजना महत्वाच्या ठरणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

SCROLL FOR NEXT