मुख्यमंत्री सावंत याच्याकडून वास्कोतील डॉक्टरांचा सन्मान 
गोवा

मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून वास्कोतील डॉक्टरांचा सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपच्या नेत्याकडून या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आरोग्य कर्मचारी तसेच भारतीय सामान्य जनतेच्या या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले

दैनिक गोमन्तक

कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Vaccination) मोहिमेचा ऐतिहासिक शंभर कोटीच्या टप्प्याचा एक भाग असलेल्या व महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या वास्कोतील डॉक्टर्स व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (CM Prmaod Sawant) यांनी आज वास्कोत (Vasco) रवींद्र भवन बायणा येथील लसीकरण केंद्रात येऊन सन्मान केला.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारताने गुरुवारी ऐतिहासिक विक्रम नोंदवत शंभर कोटी आकड्याचा पल्ला गाठल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने भारताच्या कामगिरीचे कौतुक केले असून त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) तसेच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देशभर आरोग्य कर्मचाऱ्यांचा तसेच भारतातील सामान्य लोकांचे या यशाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आज रवींद्र भवन बायणा येथे लसीकरण केंद्रात खास भेट देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

देशासह जगभरामध्ये सुरू असलेल्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात हेच त्याचे यश मिळाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारताने गुरुवारी ऐतिहासिक विक्रम नोंदवत शंभर कोटी डोसाच्या आकड्यांचा पल्ला गाठला. भारतात 16 जानेवारी 2021 पासून सुरू झालेल्या लसीकरण मोहीमेने केवळ दहाव्या महिन्यात शंभर कोटीचा टप्पा पार केला त्याबद्दल 'डब्ल्युएचओ' कडून भारताच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे.

दरम्यान याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपच्या नेत्याकडून या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आरोग्य कर्मचारी तसेच भारतीय सामान्य जनतेच्या या यशाबद्दल अभिनंदन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी रवींद्र भवन बायणा येथे लसीकरण केंद्रात खास भेट देऊन उपस्थित डॉक्टर्स व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. हा विक्रम आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे तसेच जनतेने दिलेल्या सहकार्यामुळे प्रस्थापित झाला असल्याचे गौरवोद्गार काढून सदर लसीकरण मोहिमेचा विक्रम या जगासाठी लक्षणीय कामगिरी ठरली असल्याचे डॉक्टर सावंत यांनी सांगितले. यावेळी आरोग्य कर्मचारी व इतर कोरोना योध्दांचे मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी भरभरून कौतुक केले.

नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारताने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ऐतिहासिक विक्रम नोंदवत 100 कोटींचा आकडा गाठला ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण अख्या जगात कोरोना महामारी ने थैमान घातले होते. त्यातून सुटकारा मिळवणे अत्यंत गरजेचे होते.तसेच भारत देशाने कोरोना प्रतिबंधक लस तयार करून त्यात उत्कृष्ट कामगिरी केली. अगोदर सगळ्यांना प्रश्न पडला होता, हे कसं शक्य होईल. मात्र भारत देशाने अख्ख्या जगाला साद्य करून दाखवून दिले. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे साध्य झाले. तसेच डॉक्टर्स परिचारिका यांच्यासह कोरोनायोध्दे या कामगिरीबद्दल कौतुकास पात्र असल्याचे नगरविकास मंत्री नाईक यांनी शेवटी सांगितले.

रवींद्र भान बायणा येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, यांच्यासमवेत नगर विकास मंत्री मिलिंद नाईक, नगराध्यक्ष दामोदर कासकर, रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, तसेच माजी उपनगराध्यक्ष शशिकांत परब, रवींद्र भवन बायणा लसीकरण केंद्रातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांच्या हस्ते या आरोग्य कर्मचाऱ्यांचे या मोहिमेत दिलेल्या योगदानाबद्दल मिठाई वाटून व पुष्पगुच्छ देऊन खास अभिनंदन केले कृतज्ञता व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT