CM Pramod Sawant distribute Griha Aadhar new Sanction Orders To New beneficiaries Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: महागाई वाढल्‍यास पेन्‍शनही वाढणार : मुख्यमंत्री

स्थानिकांच्या वस्तू, खाद्यपदार्थांना ई मार्केट उपलब्ध केले जाणार:

दैनिक गोमन्तक

Goa Chavath e-Bazaar: गृहआधारसारख्‍या योजना चालू करण्‍यामागे कमकुवत घटकांच्‍या वैयक्‍तिक उत्‍कर्षाचा हेतू डोळ्‍यांसमोर ठेवलेला आहे, असे सांगून यापुढे या सर्व योजना बाजारभावाशी जोडण्‍याचा सरकारचा इरादा आहे, अशी घाेषणा मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.

त्‍यामुळे महागाई वाढल्‍यास या याेजनाखाली मिळणारी पेन्‍शनची रक्‍कमही वाढणार आणि त्‍याचा फायदा गोव्‍यातील कमकुवत घटकांना होऊ शकेल, असे ते म्‍हणाले.

मडगाव येथील रवींद्र भवनात 11 हजार नवीन लाभार्थांना गृहआधारची मंजुरी पत्रे वाटण्‍याचा कार्यक्रम पार पडला. आतापर्यंत गोव्‍यात गृहआधारखाली मदत मिळणाऱ्या महिलांची संख्‍या दीड लाख झाली असून, दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली पेन्‍शन घेणाऱ्या लाभार्थ्‍यांची संख्‍याही जवळपास तेवढीच आहे.

गोव्‍यात 15 लाख लोकसंख्‍या असून त्‍यापैकी तीन लाख लोकांना सामाजिक सुरक्षा योजनांतून मदत दिली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मदत देणारे गोवा हे एकमेव राज्‍य असल्‍याचे मुख्‍यमंत्री म्हणाले.

सरकारकडून विविध सामाजिक योजनांसाठी जवळपास 300 कोटी रुपये निधी देण्यात आला. गृहआधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना अशा इतर योजनांचे पैसे ऑगस्टपर्यंत देण्यात आले तसेच मत्स्य खात्याची सबसिडी दिलेली आहे.

आधार लिंक असलेल्या बँक खात्यातच अर्ज मंजूर झालेल्या दिवसांपासून गृह आधारच्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत तसेच त्या कालावधीतील फरकही मिळणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यापूर्वी ‘चवथ बाजार’ भरवले गेले होते मात्र, त्याचा महिलांना फायदा मिळत नव्हता. यावेळी चतुर्थी ई बाजाराचा शुभारंभ केला जाणार असून यातून स्वयंसहाय्यता गट, महिला बचत गटांच्या उत्पादनांना मार्केट मिळणार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ भक्कम स्थितीत! दररोज 84 विमानांची ये-जा, 13 हजार प्रवाशांची हाताळणी; विमानतळाला 137 कोटींचा नफा

Tarun Tejpal: कधी सत्ताकेंद्रांना प्रश्न, आता कारागृहाचे नियम! कोलवाळमध्ये तेजपालचा दिवस कसा जातो? शेजारी लुथरा बंधू आणि अजय गुप्ता

Passport New Rules: पासपोर्टचे नियम अन् फी बदलली, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री; परदेश प्रवासापूर्वी ही बातमी नक्की वाचा

IND vs AFG: 18 चौकार, 22 षटकार अन् 229 धावा! अभिषेक शर्मा ठरला T20 मालिकेचा 'किंग'; टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा करिष्मा

खरी कुजबुज: भाजपचा शिस्तीचा बडगा कोसळला!

SCROLL FOR NEXT