Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Government : ‘ऑन ड्युटी’ मृत्यू झाल्यास वारसदारांना तत्काळ नोकरी

अनुकंपा योजनेंतर्गत नोकरीसाठी प्रक्रिया आणखी सोपी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Government : अनुकंपा योजनेंतर्गत नोकरीसाठी प्रक्रिया आणखी सोपी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना तत्काळ नोकरी दिली जाणार आहे. यासंदर्भात बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. भविष्यात या श्रेणीतील उमेदवारांना प्रतिक्षा यादीत ठेवले जाणार नाही. उलट त्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर पर्वरीतील विधानसभा संकुलात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, अनुकंपा योजनेनुसार 12 जणांना विविध खात्यात नोकऱ्या दिल्या आहेत. पोलिस, वीज खात्यातील मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसदार, नातेवाईकांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री रोजगार योजनेत दुरुस्तीला मान्यता दिली असून, यापुढे गोवा आर्थिक महामंडळाकडून (ईडीसी) अभियंता शिक्षण घेतलेल्यांना देखील कर्ज दिले जाईल. अभियंता शिक्षण घेतलेल्या पदवी आणि डिप्लोमा यांना ईडीसी कर्ज देणार आहे. ही तरतूद उपलब्ध नव्हती, त्यासाठी आता करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

मंत्रिमंडळाचे निर्णय

मोपा विमानतळावर नागरी उड्डाण संचालनालय स्थापित केले जाणार.

संचालनालयात कर्मचारी भरती करण्यासाठी देखील मान्यता.

गोवा पर्यटन शॅक योजनेला (2022-23) मुदतवाढ

सीएसआर उपक्रमांची जबाबदारी यापुढे नियोजन खात्याकडे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT