Pramod Sawant Convoy Accident Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आमोणेत भरधाव 'बोलेरो'! अपघात टळला, मद्यधुंद चालकास दुसऱ्या दिवशी अटक

Pramod Sawant Convoy Accident: मुख्यमंत्र्यांच्या वाहनचालकाने प्रसंगावधान राखून वाहन रस्त्याच्या कडेला घेतल्याने संभाव्य दुर्घटना टळली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

साखळी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत पणजीहून साखळी येथील निवासस्थानी परतत असताना आमोणा-विर्डी जंक्शनवर त्यांच्या ताफ्यासमोर भरधाव वेगाने आलेल्या एका बोलेरोमुळे मोठा अपघात थोडक्यात टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याप्रकरणी मद्यधुंद चालकांस पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वाहनचालकाने प्रसंगावधान राखून वाहन रस्त्याच्या कडेला घेतल्याने संभाव्य दुर्घटना टळली. या प्रकरणातील चालक समीर फडते हा पोलिस दलात हवालदार पदावर कार्यरत आहे. तो मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (११ जून) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. मुख्यमंत्री आपल्या अधिकृत ताफ्यासह आमोणा पूल ओलांडून साखळीच्या दिशेने जात होते. आमोणा-विर्डी जंक्शन परिसरात पोहोचताच जीए-०६-ई-६३४० क्रमांकाची काळ्या रंगाची बॉलेरो गाडी भरधाव वेगाने ताफ्याच्या दिशेने येताना दिसली. सदर वाहन मुख्यमंत्र्यांच्या कारच्या उजव्या बाजूने त्यांच्या वाहनाच्या दिशेने येत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने तातडीने वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले.

त्यामुळे दोन वाहनांमध्ये धडक होण्याचा धोका टळला. घटनेनंतर बॉलेरो चालकाने कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यातील एस्कॉर्ट पथकाने तातडीने कारवाई करत बॉलेरोमधील इतर पाच जणांना थांबवून ठेवले. त्यानंतर डिचोली पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत बॉलेरोमधील सर्व प्रवासी कुंभारजुवा परिसरातील असल्याचे समोर आले.

चौकशी सुरू!

डिचोली पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विशेष शोधमोहीम राबवून समीर फडते याचा माग काढला आणि त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासासाठी आवश्यक वैद्यकीय व इतर पुरावे गोळा करण्यात आले असून त्याची सविस्तर चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ayush Healthcare: गोव्यातील दोन्ही आयुष इस्पितळांचे महिनाभरात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्र्यांची माहिती

Merces Court Incident: मेरशी न्यायालयात खळबळ! पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने पोक्सो आरोपी गंभीर जखमी

IND vs WI 5th T20I, Weather Report: रोमांचक मालिका निर्णायक टप्प्यावर, पण पावसानं वाढवली धाकधूक; बंगळुरुचं हवामान ठरवणार भारत-वेस्ट इंडिज सामन्याचा निकाल

Goa Cricket Association: 50 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी जीसीएचा इशारा; आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

SCROLL FOR NEXT