Goa Moap Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: सुरक्षेत 'मोपा' सर्वश्रेष्ठ; राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे पहिले विमानतळ, मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

Goa Mopa Safety Award: उत्तर गोव्यातील मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळाने सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार पटकावला आहे

Akshata Chhatre

Manohar International Airport - Goa Airport (GOX)

मोपा: उत्तर गोव्यातील मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळाने सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार पटकावला आहे, सर्वात महत्वाची बाब म्हणजे देशभरातून हा पुरस्कार मिळवणारे गोव्याचे मोपा विमानतळ हे पहिलेच विमानतळ ठरले आहे. गोव्यातील मोपा विमानतळाला भारतीय राष्ट्रीय सुरक्षा परिषद यांच्याकडून हा पुरस्कार देण्यात आला आहे.

भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद यांच्याकडून हा सन्मान दिला जातो. देशभरातील विविध सेवा क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या विभागांकडून अर्ज मागितले जातात आणि वर्षभरात उत्तम कामगिरी बजावलेल्या, कामाच्या ठिकाणी कोणालाही हानी न पोहोचवता उत्तम कार्यक्षमता प्रदर्शित केलेल्या अर्जदाराला हा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.

गोव्यातील मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टीने निकष लावून तपासणी करण्यात आली होती, ज्यात गोव्यातील या आंतराष्ट्रीय विमानतळावर कोणताही प्रकारच्या प्राणघातक घटनांची नोंद आढळून आली नाही, परिणामी विमानतळ प्रशासनाच्या या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.

"हा पुरस्कार म्हणजे आमच्यासाठी केवळ एक शाबासकी नाही, तर सतत पुढे जाण्याची प्रेरणा आहे आणि यात काम करणाऱ्या प्रत्येकाचा तेवढाच वाटा आहे" असे मोपा आंतराष्ट्रीय विमानतळाचे सीइवओ आर. व्ही शेषन म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक:

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मोपा विमानतळाने पटकावलेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे कौतुक केले. एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री म्हणाले कि देशभरातून सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार पटकावणारे मोपा हे पहिलेच विमानतळ ठरले असून विमानतळाच्या प्रशासनाने सर्वांसमोर एक उदाहरण प्रस्तुत केले आहे. आंतरराष्ट्रीय स्थरावर देखील यामुळे गोव्यातील विमानतळाने वेगळे स्थान निर्माण केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या विशेष कामगिरीबद्दल विमानतळ प्रशासनाचे कौतुक केले आणि त्यांचे अभिनंदन देखील केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT