Pramod Sawant viral video: गोव्याच्या राजकारणात कायम आक्रमक आणि खंबीर भूमिका घेणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची एक वेगळी, आणि मनमिळाऊ बाजू नुकतीच समोर आली आहे. एका प्रमुख वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यापलीकडील काही खास गोष्टी पहिल्यांदाच उघड केल्या. नेहमीच विरोधकांना थेट उत्तर देणाऱ्या सावंत यांनी यावेळी मात्र दिलखुलासपणे संवाद साधत, एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून असलेली आपली ओळख जनतेसमोर आणली. त्यांच्या या मनमोकळ्या अंदाजामुळे मुलाखतीचा तो भाग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
मुलाखतीत रॅपिड फायरच्या दरम्यान, 'पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यासह समुद्रकिनारी डिनर करायला आवडेल की सूर्योदय पाहायला?' असा प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता 'पत्नीसोबत सूर्योदय बघायला आवडेल' असे उत्तर दिले. कामाच्या वाढत्या व्यापातून आता कुटुंबासोबत समुद्रकिनाऱ्यावर जाणे शक्य होत नाही, याची खंतही त्यांनी व्यक्त केली. लहानपणी गोव्यातील विविध किनाऱ्यांवर मनसोक्त फिरल्याच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.
ग्लोबल ओळख: गोव्याला जागतिक पातळीवर ओळख मिळावी यासाठी अधिकाधिक चित्रपटांचे चित्रीकरण गोव्यात व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे.
आवडता अभिनेता: अभिनयाचे बादशाह आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांचे सर्वात आवडते अभिनेते आहेत.
आवडते ठिकाण: गोव्यातील निसर्गाचे अद्भुत वरदान असलेला दूधसागर धबधबा त्यांना प्रचंड आवडतो. कामामुळे नेहमी तिथे जाता येत नसले तरी, वेळ मिळाल्यास नक्कीच भेट देईल, असे त्यांनी सांगितले.
आवडते खाद्य: कोणत्याही गोमंतकीय व्यक्तीप्रमाणे त्यांनाही जेवणात 'मच्छी कडी' प्रचंड आवडते. जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची त्यांना सवय आहे.
उत्सव: गोव्याच्या पारंपारिक सण आणि उत्सवांचा त्यांना विशेष अभिमान आहे. कार्निव्हल किंवा इतर आधुनिक संगीत महोत्सवांपेक्षा पारंपरिक सण त्यांना अधिक प्रिय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मुलाखतीमुळे मुख्यमंत्री सावंत यांची एक वेगळी, मनमिळाऊ आणि कौटुंबिक बाजू समोर आली आहे, जी सामान्यतः त्यांच्या राजकीय जीवनात पाहायला मिळत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.