CM Dr. Pramod Sawant And LOP Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

गोवा विधानसभेत महाभारत, रामायण; CM सावंतांच्या 'शत्रुघ्न पांडव ' उल्लेखावर काँग्रेसचं Correction

Goa Assembly Monsoon Session 2024: सभागृहातील या चर्चेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

Pramod Yadav

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून सुरु झाले असून, विरोधक विविध मुद्यावरुन सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसत आहेत. चर्चे दरम्यान बऱ्याचवेळा सत्ताधारी तसेच विरोधक एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यासह कधी कोपरखळी तर कधी खोचक टीका करतायेत.

विरोधी बाकावरील नेत्यांना पाच पांडव म्हणून टीका करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत चुकले आणि त्यांची चूक काँग्रेस आमदारांनी दुरुस्त केली.

झाले असे की, अधिवेशनाच्या चौथ्या दिवसाच्या चर्चेदरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधी बाकावरील आमदारांवर पाच पांडव म्हणत टीका केली. यावेळी त्यांनी सभागृहात शत्रुघ्न देखील पांडव असल्याचे म्हटले.

ही चूक केपेचे काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्या लक्षात येताच त्यांनी मुख्यमंत्री आणि सभागृहाच्या ते निदर्शनास आणून दिले.

एल्टन डिकॉस्तांनी सभागृहात पाच पांडवांची नावे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव असल्याचे सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते आलेमाव यांनी देखील यात डिकॉस्तांच्या मदतीला येते मुख्यमंत्र्यांची चूक दुरुस्त करावी अशी मागणी केली.

सभागृहातील या चर्चेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. यात आमदार एल्टन डिकॉस्ता, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यातील सभागृहातील संवाद दिसत आहे.

डिकॉस्ता आणि आलेमाव याप्रकरणी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना पांडव म्हणून संबोधल्याबद्दल आभार मानलेत.

'मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात शत्रुघ्न पांडव असल्याचे म्हटले. परंतू, ते महाभारतात नव्हे तर रामायणातील प्रभू रामाचे भाऊ होत. आम्हाला पांडव म्हणून संबोधल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो,' डिकॉस्ता आणि आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Opinion: 'नाव' हे फक्त एक चिन्ह, खरी ओळख तर व्यक्तीच्या 'कर्तृत्वात'

गोव्याला मिळाले पहिले खासगी विद्यापीठ! 'Parul University'मध्ये 75% गोमंतकीय विद्यार्थी; CM सावंतांच्या हस्ते उद्घाटन

Goa Politics: खरी कुजबुज; दामूंच्‍या मनात चाललंय काय?

Aggressive Dogs Ban: क्रूर कुत्र्यांच्‍या मालकांची आता मुळीच गय नाही! राज्‍यपालांच्‍या मंजुरीनंतर 2 विधेयकांचे झाले कायद्यात रुपांतर

भारत-पाकिस्तान आज पुन्हा आमने-सामने; अंतिम सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT