CM Apprenticeship Policy Dainik Gomantak
गोवा

CM Apprenticeship Policy: 15 हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी, मात्र नोंदणी केवळ 8502 जणांची

कौशल्य विकास कार्यक्रम : आज होणार अप्रेंटिसशीप पत्रांचे वितरण

गोमन्तक डिजिटल टीम

CM Apprenticeship Policy वाढत्या बेरोजगारीला कौशल्याची मात्रा देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी सरकारने महत्त्वाकांक्षी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून आज, शनिवारी राजधानी पणजीसह राज्यभर अप्रेंटिसशीप पत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी राज्यभरातून तब्बल 8502 बेरोजगारांनी नोंदणी केली असली, तरी राज्यात सरकारी आणि खासगी क्षेत्रात 15 हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

मुख्य कार्यक्रम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत ताळगावच्या कम्युनिटी सभागृहात होणार आहे. तर राज्यातील विविध तालुक्यांतील नऊ ठिकाणी ही अप्रेंटिसशीप पत्रे देण्यात येणार आहेत.

एका अर्थाने हा राज्य सरकारचा कार्यक्रम असून कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याच्या वतीने गेल्या महिनाभराहून अधिक काळ या कार्यक्रमाची तयारी करण्यात येत आहे. यासाठी केंद्र सरकारनेही मदत केली असून राज्य सरकार खासगी आस्थापने, निमसरकारी आस्थापने या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. यात मुख्यमंत्री नोंदणीकृत आणि शिकाऊ करार मिळवलेल्या बेरोजगार तरुणांना प्रशिक्षणार्थी करार प्रदान करणार आहेत.

खासगी कंपन्यांशी 200 कोटींचे करार

टाटासह जग्वारसारख्या अनेक कंपन्यांबरोबर कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याशी या कार्यक्रमात सामंजस्य करार करण्यात येणार असून सुमारे 200 कोटी रुपयांचे हे करार असतील.

या कार्यक्रमासाठी राज्य सरकारतर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून सर्व 191 पंचायती आणि सर्व नगरपालिकांमध्ये मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार असून 50 हजार दर्शक हा कार्यक्रम पाहतील.

सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन आम्ही यापूर्वीही केले होते. बेरोजगार तरुणांकडे शैक्षणिक अर्हता असली, तरी कौशल्य गुणांचा अभाव दिसतो. त्यामुळे रोजगार संधी उपलब्ध असून योग्य उमेदवार मिळत नाहीत. यासाठीच कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाकडून हे प्रयत्न केले जात आहेत. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

प्रशिक्षणार्थ्यांना स्टायपेंड

प्रशिक्षणार्थ्यांना 8 ते 13 हजार रुपये विद्यावेतन (स्टायपेंड) देण्यात येणार असून विद्युत अभियंता, स्थापत्य अभियंता, आयटी अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, अकाऊंटंट साहाय्यक ते डेटा ऑपरेटर, हेल्पर, साहाय्यक कारकून अशा स्वरूपाची संधी बेरोजगारांना उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तिसऱ्या अपत्याला 30 हजार तर चौथ्याला 40 हजार, आंध्र प्रदेश सरकारची अनोखी स्कीम; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा VIDEO

Rahu Gochar: नक्षत्र बदलून राहू करणार 3 राशींना मालामाल; मनासारखी नवीन नोकरी आणि मोठ्या पॅकेजची मिळणार ऑफर

Team India: क्रीडा जगतात मोठी खळबळ! टीम इंडियाच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप, थेट हकालपट्टीची कारवाई

Goa Dairy Subsidy: दूध उत्पादक आक्रमक! मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू; उत्तर गोवा शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा

Middle East War: एलपीजी, पेट्रोल अन् डिझेल आणखी महाग होणार? ट्रम्प-नेतान्याहूकडून मोठ्या हल्ल्याची तयारी; 'टार्गेट लिस्ट' बनवली

SCROLL FOR NEXT