Mahadayi Water Dispute In Goa
Mahadayi Water Dispute In Goa  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: मुख्यमंत्री सावंतांना हिटलरची उपमा; म्हादई प्रश्नाबाबत विरोधक आक्रमक

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: म्हादई नदीचे पाणी वळविण्याच्या मुद्द्यावरून साखळीत आयोजित करण्यात आलेल्या सभेला सरकारने परवानगी नाकारल्याच्या कृतीवर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना त्यांनी ‘ॲडॉल्फ हिटलर'' असे संबोधले असून, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कृत्याचा चोडणकर यांनी निषेध केला आहे. लोकांच्या आंदोलनाच्या हक्कावर गदा आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

चोडणकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे, काँग्रेस पक्षाने 1980 पासून चांगले आणि प्रभावीपणे प्रशासन राबविताना, अनेक आक्रमक आंदोलनांना तोंड दिले.

विद्यार्थी, कामगार संघटनांचे आंदोलन, आदिवासी, पारंपरिक मच्छीमार (रापणकार), मोटार सायकल पायलट, कोकणी आंदोलन, कोकण रेल्वे, नॉयलॉन-सिक्स्टी सिक्स, प्रादेशिक योजना 2021, गोवा बचाव अभियान अशा मोठ्या आंदोलनावेळी काँग्रेसने जनतेचा लोकशाहीचा हक्क कधीही दाबला नाही.

चोडणकर म्हणाले, देशाच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततेने एकत्र येण्याचा, निदर्शने, आंदोलने आणि जाहीर सभांद्वारे सरकारच्या कृतीवर आक्षेप नोंदविण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु भाजप सरकार लोकांच्या या अधिकारांचे उल्लंघन करून ते हक्क दडपण्याचा प्रयत्न करीत आहे.

भाजपला गांधीवादी विचार, सर्वोच्च न्यायालय आणि राज्य घटनेने मान्य केलेल्या लोकशाहीवर विश्‍वास आहे का? संविधानाचा आत्मा जपण्यासाठी व लोकांना मजबूत करण्याचे धडे भाजपने काँग्रेसकडून घ्यावेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Goa Today's Live News: मतदानाचा उच्चांक भाजपला घरी पाठविण्यासाठी!

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची गोव्याला येणारी फ्लाईट रद्द, दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ Video

Delhi Excise Policy Case: केजरीवाल विरुद्ध आमच्याकडे पुरावे, राजकारणाशी आमचा संबंध नाही; ED

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

SCROLL FOR NEXT