CM Pramod sawant Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत नाराज, गोवा विद्यापीठाचे मानांकन घसरल्यावरुन व्यक्त केली चिंता

Goa University: विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी आपण कोठे कमी पडतो, याची कारणे शोधावीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa University

पणजी: गोवा विद्यापीठात मोठ्या प्रमाणात साधनसुविधा, मनुष्यबळ असूनही विद्यापीठाचे मानांकन ढासळतेच कसे, अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विद्यापीठाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. विद्यापीठातून उत्तीर्ण होणाऱ्या अर्ध्याहून अधिक पदवीधरांना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हेही माहीत नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली.

गोवा विद्यापीठ संशोधन पार्कच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर, कुलसचिव प्रो. विष्णू नाडकर्णी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, आता विद्यापीठ संशोधनाच्या अनुषंगाने नवे पाऊल टाकत आहे. त्यामुळे यापुढे विद्यापीठाचे मानांकन ढासळता कामा नये.

‘जीपीएससी’साठी विद्यार्थी तयार नाहीत, ही शोकांतिका!

राज्यातील पदवीचे शिक्षण घेतलेल्या ५० टक्के विद्यार्थ्यांना जीपीएससी परीक्षा म्हणजे काय किंवा स्पर्धात्मक परीक्षा कोणत्या असतात, याची माहिती नसते. ज्या विद्यार्थ्यांना माहिती असते ते सांगतात, मला या परीक्षा देण्यास भीती वाटते, मी या परीक्षांमध्ये पास होईन याबाबत मला विश्‍वास नाही.

राज्यातील ८० टक्के पदवीधर विद्यार्थी हे स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार नाहीत, ही मोठी शोकांतिका असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

महाविद्यालयांनीही आत्मपरीक्षण करावे!

गोवा विद्यापीठातून उत्तीर्ण होणारा विद्यार्थी कुठेच मागे पडता कामा नये. त्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयार करावे लागेल. तसे जर होत नसेल तर विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी आपण कोठे कमी पडतो, याची कारणे शोधावीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला लुबाडले

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

SCROLL FOR NEXT