Dr. Soumya Swaminathan Dainik Gomantak
गोवा

Climate Change: तापमानवाढीमुळे गोव्याचीही स्थिती बिकट! कृषी, मासेमारीवर जीवन जगणं होणार कठीण; सौम्या स्वामिनाथन यांनी व्यक्त केली चिंता

Goa Climate Change Impact: गोवा हे लहान राज्य आहे, परंतु तापमानवाढीमुळे येथील देखील स्थिती बिकट आहे. कदाचित भविष्यात कृषी आणि मासेमारी या पारंपरिक व्यवसायावर आपण आपले जीवन व्यतीत करू शकणार नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा हे लहान राज्य आहे, परंतु तापमानवाढीमुळे येथील देखील स्थिती बिकट आहे. कदाचित भविष्यात कृषी आणि मासेमारी या पारंपरिक व्यवसायावर आपण आपले जीवन व्यतीत करू शकणार नाही. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक रुची निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत प्रख्यात वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी व्यक्त केले.

विज्ञान (Science) परिषद गोवा आयोजित भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाच्या उद्‍घाटन कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विवेकानंद पै, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रमुख राजेंद्र भोबे, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन, प्रसाद रांगणेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

डॉ. स्वामिनाथन पुढे म्हणाल्या की, जगातील श्रीमंत देशांचे तापमान वाढीत मोठ्या प्रमाणात योगदान आहे, परंतु त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. यात भारतासारख्या विकसनशील देशांना अधिक भोगावे लागणार आहेत. कारण आपल्याकडे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, गरीबी अधिक आहे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यावर उपाय शोधणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

वैज्ञानिक साक्षरतेला प्राधान्य हवे

टीबीसारख्या आव्हानांना सामोरे आम्हालाच जावे लागेल. आपला आहार असंतुलित होत आहे. काहीवेळा आपली परिस्थिती नसल्यामुळे तर काहीवेळा अज्ञानामुळे या गोष्टी घडत आहेत. तंबाखू आणि मद्यपान आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वैज्ञानिक चित्रपट महोत्सवातून आपण वैज्ञानिक साक्षरतेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. गोवा टीबीसंबंधी कार्यात देशभरात अग्रेसर असल्याचेही डॉ. स्वामिनाथन यांनी नमूद केले.

विज्ञान चित्रपट महोत्सवाचे उद्‍घाटन

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि शास्त्रज्ञ जयंत सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून या विज्ञान चित्रपट महोत्सवाची सुरवात झाली आणि मागील दहा वर्षे हा उपक्रम सुरू आहे. गोव्यातील विद्यार्थ्यांमध्ये (Students) विज्ञानासंबंधीची रुची वाढावी यासाठी हा उपक्रम आहे. गोव्यात अनेक विज्ञानासंबंधीच्या संस्था कार्यरत आहेत, त्याचा लाभ करून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी समुद्रकिनाऱ्यावर सहलीसाठी न नेता वैज्ञानिक संस्थांना भेट देणे गरजेचे आहे. या महोत्सवातील प्रदर्शन, विज्ञान ग्राम व इतर उपक्रम विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

महोत्सवातील आकर्षण

चित्रपट प्रदर्शन

कुतूहल - विज्ञान प्रदर्शन

भारतीय ज्ञान प्रणाली

रोबोटीक्स

फिल्म मेकिंग

सायफी चॅलेंज

विज्ञानिका - विद्यार्थी विज्ञान ग्राम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT