Goa Aggressive Dogs Ban Dainik Gomantak
गोवा

Aggressive Dogs Ban: रॉटविलर, पिटबुलवर बंदीचा मार्ग मोकळा! विरोधकांचा विरोध झुगारत दोन विधेयकांना मंजुरी

Goa Aggressive Dogs Ban: विरोधी आमदारांचा विरोध झुगारत सरकारने बुधवारी ‘गोवा दावे मूल्‍यांकन विधेयक : २०२५’ व ‘गोवा पशुसंवर्धन आणि पाळीव प्राणी (नियमन आणि भरपाई) विधेयक : २०२५’ सभागृहात मंजूर करून घेतले.

Sameer Amunekar

पणजी: विरोधी आमदारांचा विरोध झुगारत सरकारने बुधवारी ‘गोवा दावे मूल्‍यांकन विधेयक : २०२५’ व ‘गोवा पशुसंवर्धन आणि पाळीव प्राणी (नियमन आणि भरपाई) विधेयक : २०२५’ सभागृहात मंजूर करून घेतले. या दोन्‍ही विधेयकांतील त्रुटी दाखवत विरोधकांनी सरकारला कात्रीत पकडण्‍याचे पूर्ण प्रयत्‍न केले. परंतु सरकारने माघार न घेता ही विधेयके मंजूर करून घेतली.

सदर विधेयकांना काही महिन्‍यांपूर्वी राज्‍य मंत्रिमंडळाने मान्‍यता दिली होती. त्‍यानंतर आज बुधवारी ती सभागृहात आली. ‘गोवा दावे मूल्‍यांकन विधेयक २०२५’ सादर झाल्‍यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, आलेक्‍स रेजिनाल्‍ड आदींनी त्‍यातील त्रुटी सरकारसमोर मांडल्‍या. फेरेरा यांनी काही सूचनाही केल्‍या. त्‍यावर विरोधकांच्‍या सूचनांचा गांभीर्याने विचार केला जाईल, अशी ग्‍वाही देत मुख्‍यमंत्र्यांनी हे विधेयक मंजूर करून घेतले.

‘गोवा दावे मूल्यांकन विधेयक’ हे ‘गोवा कोर्ट फी कायदा, २०२४’ च्या तरतुदींशी सुसंगत आहे. गोव्यात दाव्यांचे मूल्यांकन करण्यासाठी एक नवीन चौकट प्रदान करण्याच्‍या उद्देशाने तयार करण्‍यात आले आहे.

लोकांच्‍या सुरक्षिततेला प्राधान्‍य देऊन विधेयक

‘गोवा पशुसंवर्धन आणि पाळीव प्राणी (नियमन आणि भरपाई) विधेयक, २०२५’ विधानसभेत संमत झाल्‍याने रॉटविलर आणि पिटबूल या हिंस्र जातीच्‍या दोन कुत्र्यांवरील बंदीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या जातीच्‍या कुत्र्यांनी गेल्‍या काही वर्षांत नागरिक आणि मुलांवर हल्ला चढवला. त्‍यात अनेकजण जखमी झाले. त्‍यामुळे जनतेचा विचार करूनच हे विधेयक आणल्‍याचे मुख्‍यमंत्री सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT