Church Trespassing Case Dainik Gomanatk
गोवा

Church Trespassing Case: चर्चच्या आवारात बेकायदेशीर प्रवेश; 5 जणांविरुद्ध खटला चालवण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश

Goa Sessions Court Order: १८ ऑगस्ट २०२४ रोजी चर्चच्या आवारात राहणाऱ्या महिलेने पणजी पोलिसांत तक्रार दिली होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ताळगाव येथील हिंदुस्थानी कोव्हनंट चर्चच्या आवारात २०२४ मध्ये घडलेल्या प्रकरणात मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच जणांविरुद्ध गुन्हेगारी अतिक्रमणाचा खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, चोरून चित्रिकरण केल्याच्या आरोपातून आशिष जाधव, गोविंदकुमार चौहान, व्यंकटेश पुजारी, जगन्नाथ बडिगेर आणि परशुराम वरद यांना दोषमुक्त करण्यात आले आहे.

१८ ऑगस्ट २०२४ रोजी चर्चच्या आवारात राहणाऱ्या महिलेने पणजी पोलिसांत तक्रार दिली होती. संशयितांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा न्यायालयाचा आदेश नसताना आवारात जबरदस्तीने प्रवेश केला. आपण आंघोळ करत असताना चित्रिकरण करून विनयभंग केला, तसेच पतीला धक्काबुक्की व धमकी देऊन खोली रिकामी करण्यास सांगितल्याचा आरोप महिलेने केला होता.

याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७७, ३२९(४), ३५१(२), ११५(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, तपासादरम्यान मिळालेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये महिलेचे खासगी क्षण चित्रित केल्याच्या दाव्याला दुजोरा मिळाला नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे पाचही जणांना चित्रिकरणाच्या आरोपातून दोषमुक्त केले.

दरम्यान, कलम ३२९(४) सह कलम ३(५) अंतर्गत गुन्हेगारी अतिक्रमणाचा खटला चालवण्यासाठी प्रथमदर्शनी पुरेसे कारण असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. प्रकरणाची कागदपत्रे उत्तर गोव्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले असून, पाचही जणांना ३० नोव्हेंबर २०२६ रोजी मेरशी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Islands Boundary: सरकारी बेटांचे प्रत्यक्ष सर्वेक्षणच नाही! गुगल अर्थच्या आधारे माहिती; 'सीझेडएमपी 2019'मधील समावेशाचा प्रश्न ऐरणीवर

Goa Weather: गोव्यात पुढील 5 दिवस हवामान राहणार कोरडे! पहाटे गारवा, दुपारी उन्हाचा चटका

US Banking Outage 2026: मायक्रोसॉफ्टनंतर आता अमेरिकेत बँकिंग सर्व्हर डाऊन! बँक ऑफ अमेरिका आणि चेस बँकेच्या सेवा ठप; ग्राहकांमध्ये खळबळ

Goa Census: जनगणना 2027 साठी स्वयंगणना सुरू! मुख्यमंत्र्यांनी स्वतःची माहिती भरली; बनावट लिंकपासून सावध राहण्याचा इशारा

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत NC-JCM चा मोठा दावा! अंमलबजावणीस उशीर झाल्यास एरियरचे नुकसान होणार का? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT