Ferry Boat Dainik Gomantak
गोवा

Ferry Boat Services: चोडण-रायबंदर फेरीबोटीचा प्रश्न काही सुटेना, वारंवार नादुरूस्तपणाने प्रवाशांत संताप

फेरी धक्क्यावर सकाळ-संध्याकाळ वाहनांची मोठी कोंडी, धुक्यामुळे होतो परिणाम

गोमन्तक डिजिटल टीम

Chorao Ferry Boat: चोडण-रायबंदर जलमार्गावरील गेल्या काही दिवसांपासून पाचपैकी एक किंवा दोन फेरीबोटी नादुरुस्त होत आहेत. या समस्येमुळे सकाळी चोडण व संध्याकाळी रायबंदर धक्क्यावर प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने प्रवाशांना व वाहनचालकांना मोठाच मनस्ताप होत आहे.

चोडण-रायबंदर हा जलमाार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक होत असून या मार्गावरील एक जरी फेरीबोट नादुरूस्त झाली तर वाहनांच्या व दुचाकींच्या मोठया रांगा दिसतात. गेल्या पंधरा दिवसात या मार्गावर एकतरी फेरीबोट नादुरूस्त होत आहे.

जुन्या फेरीबोटीबरोबरच दोन इंजिनच्या नव्या फेरिबोटी नादुरूस्त होत असल्याने प्रवाशांतून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. गेले पंधरा दिवस लोकांना सातत्याने मनस्ताप सोसावा लागत असूनही खाते, स्थानिक प्रनिनिधी यावर काहीच उपाय योजना करीत नसल्याने या मार्गावरील प्रवाशांत व वाहनचालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षभरापासून चोडण ग्रामस्थांतर्फे या मार्गावरील फेरीबोटी व्यवस्था सुधारण्यासाठी खास ग्रामसभा घेण्याचा ठराव घेऊनही स्थानिक पंचायत यावर प्रतिसाद देत नाही. २० आॅगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात येईल,असे पंचायत मंडळाने सागितले होते. पण याची पूर्तता पंयाचतीने केलेली नाही.

गेल्या २३ फेब्रुवारी रोजी चोडण ग्रामसभेत चोडण ग्रामस्थांच्या वाहनांना खास पासेस द्यावेत, व त्यांना प्रथम प्राधान्य द्यावे,फेरीबोट वाहतूक सुरळीत करावी व दोन्ही धक्क्यांवर वाहनांची मोठी कोंडी होते, ती येत्या १५ दिवसांत दूर करावी, अशा आशयाचा ठराव घेण्यात आला होता. त्यावर ग्रामसभेत उपस्थित आमदार प्रेमेंद्र शेट यांनी ठरावाची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते.

मंगळवारी दि. २२ आॅगस्ट रोजी सकाळी काही प्रमाणात धुके पडल्याने सर्व फेरीबोटी रायबंदर धक्क्यावर गेल्या सकाळची ६ ची फेरीबोट न सुटल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली.

नंतर फेरीबोट आल्याने प्रवाशांनी सुस्कारा सोडला. धुक्यावर नियंत्रण ठेवून फेरीबोटी चालविण्यासाठी आधुनिक उपाययोजना आल्या आहेत, पण त्याचा उपयोग केला जात नाही.

ठराव नावालाच !

पंचायत सचिव गावस यांनी सांगितले,की हा ठराव अजूनही पाठवलेला नाही. यामुळे ग्रामसभेत घेतलेले ठराव सरकारी कार्यालयांत पाठवले जात नसल्याची प्रतिक्रिया गेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी व्यक्त केली होती.

पुढील ग्रामसभेच्या आठवडाभर आधी हे ठराव पाठविण्यात येत असल्याचा अनुभव ग्रामस्थांना गेल्या ग्रामसभेत आला होता.

वेठीस धरण्याचा प्रकार!

नादुरूस्त फेरीबोटीमुळे चोडण व इतर मार्गावरील वाहनचालकाना एक ते दोन तास फेरीबोटीच्या प्रतीक्षेत राहावे लागते. खासगी कामगार, सरकारी, विद्यार्थी यांना याचा फटका बसतो.

काही रूग्णांनाही याचा फटका बसत असल्याचे दृष्य पहायला मिळते. या मार्गावरील अत्यावश्यक सेवेत सुधारणा व्हावी, अशी मागणी प्रवाशी व वाहनचालकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa IIT Project: गोव्यात 'आयआयटी'ची खरोखरच गरज आहे काय?

Anjuna: बनावट कागदपत्रांद्वारे लाखो चौ.मी. लाटली जमीन! हणजूण कोमुनिदाद अध्यक्षांचा आरोप; SIT, ED कडे तक्रारी

"तुम्ही भाजपचे एजंट, हिम्मत असेल तर समोर येऊन चर्चा करा", पाटकरांचे केजरीवालांना थेट आव्हान; गोव्यात राजकीय जुगलबंदी! Watch Video

Leopard In Goa: ..पुन्हा बिबट्याची डरकाळी! डिचोली परिसरात दहशत; रात्री रस्त्यांवर शुकशुकाट

Vasco Accident: टेम्पो-मारुती व्हॅनमध्ये भीषण अपघात, दोन्‍ही चालक जखमी; वाहतूक काही काळ ठप्प

SCROLL FOR NEXT