Laxmikant Parsekar: नर्सिंग शिकणाऱ्यांसाठी गुड न्यूज! ‘हरमल पंचक्रोशी’ मध्येही आता नर्सिंगला मिळणार प्रवेश

लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती: दरवर्षी शंभर परिचारिका शिकून बाहेर पडणार
Laxmikant Parsekar
Laxmikant ParsekarDainik Gomantak
Published on
Updated on

Laxmikant Parsekar हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाला कॉलेज ऑफ नर्सिंग सुरू करण्याची मान्यता मिळाली आहे. जीएनएम, एएनएम आणि बीएससी नर्सिंग, बारावी नंतर नेट परीक्षेनुसार दरवर्षी शंभर विद्यार्थ्यांना नर्सिंग विद्यालयात प्रवेश मिळणार आहे.

दरवर्षी शंभर नवीन परिचारिका या विद्यालयातून बाहेर पडणार असून गोव्यातच नव्हे तर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्या रोजगार मिळवू शकतात,अशी माहिती संस्थेचे चेअरमन तथा माजी मुख्यमंत्री प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पंचक्रोशी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका स्मिता पार्सेकर कॉलेज ऑफ नर्सिंग स्कूलच्या प्राचार्य पाऊल आदी उपस्थित होते.

Laxmikant Parsekar
Goa CM meets Sitharaman: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट

पार्सेकर म्हणाले की, हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाने हरमल पंचक्रोशी पूर्व प्राथमिक, प्राथमिक विद्यालय, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि व्होकेशनल स्टडीज, गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन, तसेच विशेष मुलांच्या शिक्षणाची सोय या संस्थेने केली आहे.

आणि आताच कॉलेज ऑफ नर्सिंग विद्यालय कार्यरत करत असताना एएनएम,जीएनएम साठी राज्य नर्सिंग कौन्सिलची शिवाय बीएससी नर्सिंगला गोवा विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे.

हे नर्सिंग स्कूल बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. ‘गोमेकॉ’मधून दरवर्षाला किमान सहाशे डॉक्टर तयार होतात, आणि त्यांना बाराशे परिचारिकांची आवश्यकता आहे.

Laxmikant Parsekar
Goa Fraud Case: क्षत्रिय मराठा समितीत कोटीचा घोटाळा! 'त्या' सात सभासदांकडून पै-पै वसूल करणार, कार्यकारिणीचा इशारा

दीड वर्षात नव्या इमारतीत स्थलांतर !

धारगळ येथे आयुर्वेद संस्थान, म्हापसा येथे खासगी तसेच जिल्हा हॉस्पिटल आहे. शिवाय गोवा मेडिकल कॉलेज आहे. या सर्वांशी संलग्न होऊन हे विद्यालय परिचारिका घडवणार आहे.

त्या त्या हॉस्पिटलमध्ये परिचारिकांना प्रशिक्षण देण्यासाठीही त्यांच्या वाहतुकीची सोय केल्याचे पार्सेकर म्हणाले.

या विद्यालयात एकूण सहा लॅबोरेटरीज आहेत. दीड वर्षात नवी इमारत उभारून कॉलेज ऑफ नर्सिंगचे स्थलांतर करण्यात येईल, असे पार्सेकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com