Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी गृहमंत्री पद सोडावं

गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांचा थेट निशाणा

गोमन्तक डिजिटल टीम

Vijai Sardesai : सिद्धी नाईक खून प्रकरण, त्यानंतर सोनाली फोगट खून प्रकरण आणि आता कुडचडेतील गोळीबार. ही मालिका पाहता गोव्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे आता डॉ. प्रमोद सावंत यांनी गृहमंत्री पदावरून पायउतार होणेच योग्य ठरेल, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.

याप्रकरणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी विजय सरदेसाई यांनी केली आहे. कुडचडे येथे बेकायदेशीर वाळू व्यवसाय चालतो, त्याला पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.

बाणसाय कुडचडे येथे वाळू माफियांच्या गोळीबारात परप्रांतिय कामगाराचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृत कामगाराचे नाव युसुफ आलम (23, राहणार झारखंड) असे असून या हल्ल्यात महमद साहू (33) हा कामगार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. तर एक जण हल्ल्यातून बचावला.

पोलिस अधिक्षक सॅमी तावारीस यांनी सांगितले, की बुधवारी मध्यरात्री दीड वाजता बाणसाय कुडचडे येथे झुवारी नदीच्या फाट्यात बेकायदेशीररित्या रेती काढण्यासाठी तीन कामगार बोट घेऊन जात होते. नदीपात्रातून जात असताना अज्ञातांनी अंधाराचा फायदा घेऊन नदीच्या काठावर राहून अगदी जवळून बंदुकीच्या गोळ्या झाडल्याने युसूफ आलमचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून अवैध रेती उत्खननावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT