Assembly Election Dainik Gomantak
गोवा

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

Goa Assembly Election: राज्यात जातनिहाय जनगणना १ डिसेंबर २०२६ ते ४ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार असून, त्यानंतर ५ ते ९ जानेवारी २०२७ या कालावधीत पुनरावृत्ती फेरी घेण्यात येणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात जातनिहाय जनगणना १ डिसेंबर २०२६ ते ४ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार असून, त्यानंतर ५ ते ९ जानेवारी २०२७ या कालावधीत पुनरावृत्ती फेरी घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या रजिस्ट्रार जनरल यांनी केंद्रीय राजपत्रात तसा आदेश प्रकाशित केला आहे. यामुळे विधानसभा निवडणूक फेब्रुवारीच्या अखेरीस होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुढील वर्षी जनगणना होणार असल्याचे गृहित धरून विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या अखेरीस घेण्याची शक्यता चर्चेत होती. केंद्र सरकारच्या आजच्या आदेशामुळे त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. देशातील आगामी जनगणनेबाबत केंद्राने महत्त्वाची घोषणा केली असून, गोवा, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांसाठी तसेच उत्तराखंडच्या हिमाच्छादित भाग वगळता अन्य क्षेत्रांसाठी ५ जानेवारी २०२७ रोजी मध्यरात्री १२ वाजता जनगणनेची संदर्भ तारीख निश्चित करण्यात आली आहे.

गोव्यासह उत्तर प्रदेश, पंजाब...

केंद्र सरकारने यापूर्वी १६ जून २०२५ रोजी काढलेली अधिसूचना अधिक्रमित करून भारताची जनगणना २०२७ मध्ये घेण्याचे नव्याने जाहीर केले आहे. देशासाठी सर्वसाधारण जनगणनेची संदर्भ तारीख १ मार्च २०२७ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, काही हिमाच्छादित भागांसाठी १ ऑक्टोबर २०२६, तर गोव्यासह उत्तर प्रदेश आणि पंजाबसाठी ५ जानेवारी २०२७ ही स्वतंत्र संदर्भ तारीख निश्चित करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT