वास्को मुस्लिम बांधवांनी काढलेला जुलूस. Dainik Gomantak
गोवा

Goa: मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस पारंपारिक पद्धतीने साजरा

पोलिस (Police) बंदोबस्त होता मात्र यावर पोलिस कारवाई (Action) करु शकले नाही.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: मुस्लिम बांधवातर्फे आज ईद- ई- मिलाद,(Eid-e-Milad) जुलूस काढून उत्साहात साजरा करण्यात आला. मुस्लिम उत्सवातील त्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे मोहम्मद पैगंबर (Muhammad) यांचा जन्मदिवस आज वास्कोत (Vasco) उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नमाज, भव्य जुलूस आधी पारंपारिक कार्यक्रमानीशी मुस्लिम बांधवातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

दुपारी तीन वाजल्यापासून नवेवाडे, बायणा, मांगुरहिल आदी भागातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांनी सहभागी होऊन भव्य जुलूस काढण्यात आला. यात अबाल वृद्धबरोबर लहान मुलांनी सहभागी होऊन शक्तिप्रदर्शन केले.

या वेळी मिरवणुकीत (procession) सामील झालेल्या मुस्लिम बांधवांना रस्त्या-रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी दूध पेयाचे वाटप करण्यात येत होते. मिरवणुकीत चारचाकी वाहनांबरोबर दुचाकी वाहनांची रेलचेल होती. चार चाकी वाहनावर ध्वनिमुद्रण (Sound recording) लावून मुस्लिम बांधव नारेबाजी लावत होते. मिरवणूकीचा शेवट येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मशिदीसमोर सभेने करण्यात आला.

दरम्यान दीड वर्षानंतर आज झालेल्या या मिरवणूक कार्यक्रमाला परवानगी दिल्याने मुस्लिम बांधवांनी सरकारच्या नियमावलीला केराची टोपली दाखवली. सामाजिक अंतराचा फडशा पाडताना, मास्क परिधान न करता शेकडो मुस्लिम बांधवांनी या जुलूसात सहभाग दर्शविला. या वेळी पोलिस (Police ) बंदोबस्त होता मात्र यावर पोलिस कारवाई करु शकले नाही. तसेच वाहतूक पोलीसही यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT