Goa to Pandharpur Railway Dainik Gomantak
गोवा

Goa to Pandharpur Railway: पाऊले चालती पंढरीची वाट… गोव्याहून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सेवा सुरू, विठ्ठल भक्तांना दिलासा

Goa to Pandharpur: पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता गोव्यातून रेल्वेने थेट पंढरपूरला जाणे अधिक सोपे झाले आहे.

Sameer Amunekar

पणजी: पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता गोव्यातून रेल्वेने थेट पंढरपूरला जाणे अधिक सोपे झाले आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेने (South Western Railway) कॅसल-रॉक येथून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कॅसलरॉक-मिरज एक्सप्रेस (गाडी क्रमांक १७३३४) ही रेल्वे ४ ते ९ जुलै या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात पंढरपूरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गोव्यातून निघणाऱ्या भाविकांना आता थेट पंढरपूरला रेल्वेने पोहोचणे शक्य होणार आहे. विशेषतः आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भाविकांसाठी अत्यंत सोयीचा ठरणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या या वाढीव सेवेमुळे पंढरपूरच्या वारीत सहभागी होण्याची सोय अधिक सुलभ झाली असून, गोवा, उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील भाविकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

वारीच्या काळात रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना पर्यायी व सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे.

रेल्वे प्रशासनाने गोवा, उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातील पंढरपूरच्या वारीला जाण्यास इच्छुक असलेल्या सर्व भाविकांना या संधीचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Youth Protes: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

SCROLL FOR NEXT