Goa Caste Census Dainik Gomantak
गोवा

Goa Caste Census: गोव्यात जातनिहाय जनगणनेची तयारी सुरू; 16 नोव्हेंबरपासून नोंदणी, 3,557 प्रगणक मैदानात

Goa Caste Census Self Enumeration Date: जातनिहाय जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांना १६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत स्व-नोंदणी करता येणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: जातनिहाय जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांना १६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत स्व-नोंदणी करता येणार आहे. यासाठी जनगणना संचालनालयाने अर्ज निश्चित केला असून नागरिकांना स्वतःची माहिती नोंदविण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर १ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत प्रत्यक्ष जनगणनेचे काम करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी राज्यात ३,५५७ प्रगणक आणि ५९३ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

जनगणना संचालनालयातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष जनगणनेच्या कामासाठी प्रगणकांना २६ ऑक्टोबरपासून तालुकास्तरावर प्रशिक्षण दिले जाणार आहे. जनगणनेचे काम अचूकपणे आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. जनगणनेदरम्यान नागरिकांकडून माहिती संकलित करण्यासाठी एकूण ४० प्रश्न निश्चित करण्यात आले आहेत.

या जनगणना प्रक्रियेत शहरी आणि ग्रामीण भागांसाठी स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था आखण्यात आली आहे. शहरी भागात उपजिल्हाधिकारी, तर ग्रामीण भागात मामलेदार जनगणना अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या अधिकाऱ्यांना पर्वरी येथील सचिवालयात तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे जनगणनेच्या प्रत्यक्ष कामाचे नियोजन, कर्मचारी व्यवस्थापन आणि माहिती संकलनाच्या प्रक्रियेवर संबंधित अधिकारी देखरेख ठेवतील.

पर्यवेक्षक म्हणून शिक्षकांची नियुक्ती

प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षण खात्यातील कर्मचाऱ्यांवर प्रामुख्याने अवलंबून राहण्याचे नियोजन आहे. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक विद्यालयांतील शिक्षक प्रगणक म्हणून काम पाहतील, तर उच्च माध्यमिक विद्यालयांचे प्राचार्य पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतील. प्रगणकांकडून संकलित करण्यात येणाऱ्या माहितीवर पर्यवेक्षक देखरेख ठेवतील.

स्व-नोंदणीला महत्त्व

जातनिहाय जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात १६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान स्व-नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना स्वतःची माहिती नोंदविण्याची संधी मिळेल. त्यानंतर १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष जनगणना सुरू होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत निश्चित केलेल्या ४० प्रश्नांच्या आधारे माहिती संकलित केली जाणार आहे. निर्धारित कालावधीत जनगणनेचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि नियुक्त कर्मचारी सज्ज होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russia Drone Attack: रशियाचा युक्रेनच्या रेल्वे स्टेशनवर भीषण ड्रोन हल्ला; 13 जणांचा मृत्यू तर 10 जखमी, झेलेंस्कींनी व्यक्त केला संताप!

Rajnath Singh: 'पाकिस्तानला लष्करी मदत देणे बंद करा', राजनाथ सिंह यांचा अमेरिकेला स्पष्ट इशारा; एफ-16 पॅकेजला दर्शवला विरोध

Government Job: हिंसक आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना 'या' सरकारचा मोठा दणका; सरकारी नोकरीसाठी चारित्र्य पडताळणीचा नवा नियम लागू

Budh Gochar 2026: ग्रहांच्या राजकुमाराची बदलली चाल! बुधाच्या कृपेने धनलाभाचा योग; 3 नोव्हेंबरपासून सुरु होणार 'या' 5 राशींचा गोल्डन पिरियड

RBI Plastic Currency: 'आत्मनिर्भर भारता'चे आणखी एक पाऊल! केंद्र सरकारकडून 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांच्या छपाईला मंजुरी

SCROLL FOR NEXT