Goa casino Dainik Gomantak
गोवा

गोव्यात ‘गेमिंग कमिशन’ नाहीच!

कायदा पुरेसा असल्याचं विजय सरदेसाईंच्या प्रश्‍नाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं उत्तर

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यासाठी गेमिंग कमिशनसाठी प्रस्ताव विचारात नाही. ऑनलाईन कसिनोवर नियंत्रण तसेच देखरेखसाठी गोवा सार्वजनिक जुगार कायदा 1976 पुरेसा आहे. राज्यात गेमिंग किंवा जुगार हब निर्माण करण्याचा कोणताच प्रस्ताव नाही, अशी माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील अतारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना लेखी दिली आहे.

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी अतारांकित प्रश्‍नाद्वारे राज्याला गेमिंग कमिशनची आवश्‍यकता आहे का आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सद्यस्थिती काय आहे, प्रश्‍न विचारला होता. राज्यातील तरंगते कसिनो मांडवी नदीमधून इतर ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी विचारात आहे का आणि असल्यास त्याची माहिती देण्याची विनंती त्यांनी केली होती.

आमदार विजय सरदेसाई यांच्या प्रश्‍नांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सध्या तरी गेमिंग झोन अथवा जुगार हब निर्माण करण्याचा कोणताही विचार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.

...तोपर्यंत कसिनोे मांडवीत

तरंगत्या कसिनोंना सरकारने 30 सप्टेंबर 2021 रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार एक वर्षापर्यंत परवाने दिले आहेत. त्याची मुदत 30 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे. या कसिनोंसाठी पर्यायी जागा उपलब्ध करण्यात येईपर्यंत किंवा अधिसूचनेत नमूद केल्यानुसार त्यांना देण्यात आलेल्या परवान्याच्या तारखेपर्यंत ते मांडवी नदीत असतील, असे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान भाजपचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात हे यापूर्वी पणजी मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवून निवडून आले होते, तेव्हा मांडवी नदीतील तरंगते कसिनो 100 दिवसांत स्थलांतरित केले जातील, असे ठोस आश्‍वासन पणजीवासीयांना दिले होते. या कसिनोंमुळे पणजीतील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची दखल त्यांनी घेतली होती. मात्र, काही महिन्यांतच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर मोन्सेरात विसरून गेले होते. सरकारमध्ये असल्याने त्यांनी या प्रकरणाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT