Goa Cashew Feni News Dainik Gomantak
गोवा

Goa Cashew Production: गोव्यात काजू उत्पादनात घट, 'फेणी-हुर्राक' उद्योग संकटात; शेतकरी, व्यावसायिकांना मोठा फटका

Goa Cashew Feni: गोव्याला काजू आणि नारळ या दोन्ही पिकांसाठी ओळखले जाते. काजू उत्पादनापासून फेणी बनविली जाते, जिला फेणी ‘गोव्याची राणी’ असेही संबोधले जाते.

Sameer Panditrao

पणजी: गोव्याला काजू आणि नारळ या दोन्ही पिकांसाठी ओळखले जाते. काजू उत्पादनापासून फेणी बनविली जाते, जिला फेणी ‘गोव्याची राणी’ असेही संबोधले जाते. परंतु मागील चार-पाच वर्षांपासून काजू उत्पादक शेतकरी, काजूगर व्यावसायिकांसोबतच फेणी उत्पादनावर अंबलंबून असलेल्या शेतकरी तसेच व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

राज्यात मागील चार-पाच वर्षांपासून सातत्याने काजू पिकात घट होत असून याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतच आहे. त्यासोबतच काजू पिकावर अवलंबून असलेल्या हुर्राक आणि फेणी उत्पादक व्यावसायिकांना देखील त्याचा फटका बसत आहे.

फेणी तसेच हुर्राकासाठी आवश्‍यक असलेले बोंडू मिळणे कठीण होत आहे. दिवसेंदिवस खर्च वाढत आहेत आणि त्याचा परिणाम स्वरूप आज जेवढी काजूला मागणी आहे, त्याहीपेक्षा पुरवठा कमी होत असून त्याचा फटका व्यावसायिकांना बसत आहे.

Cashew

बोंडूची गुणवत्ता खालावली

पूर्वी ज्या स्थानिक काजूचे बोंडू असायचे ते आकाराने जरी काही प्रमाणात छोटे होते, तरी त्यात रस अधिक असायचा. आता अनेक बोंडू दिसायला भले मोठे दिसतात परंतु रसाच्या दृष्टीने कमी असतात. त्यात काजू उत्पादन कमी झाल्याने बोंडू मिळविण्यासाठी भटका लागते. त्यामुळे वाहतूक खर्च वाढतो. परिणामस्वरूप दरात वाढ करावी लागते, असे फेणी उत्पादकांचे म्हणणे आहे.

यंदा सुरवातीला काजू पीक चांगले आले होते, परंतु अवकाळी पावसामुळे पिकात घट झाली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी उत्पादनात घट झाली आहे.
संजय कारबोटकर, काजू व फेणी उत्पादक शेतकरी
काजू उत्पादनात घट झाल्याने आवश्‍यकतेनुसार बोंडू मिळणे कठीण झाले आहे. अन्य ठिकाणाहून बोंडू आणून फेणी गाळप केले जाते त्यामुळे खर्च वाढला आहे.
राज दिवकर, प्रसिद्ध फेणी व्यावसायिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT