Pooja Naik Dainik Gomantak
गोवा

Pooja Naik: '17 कोटी परत द्या, अन्यथा..'! पूजा नाईक ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मंत्री, IAS अधिकारी, अभियंत्‍याची नावे जाहीर करणार?

Cash For Job Goa: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील पूजा नाईक हिने आपण मंत्री, आयएएस अधिकारी आणि ‘पीडब्‍ल्‍यूडी’च्‍या अधिकाऱ्याला १७ कोटी रुपये दिल्याचा दावा केल्‍याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्‍यात अनेक महिने गाजलेल्‍या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात पूजा नाईक नेमके कोणता मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंत्‍याचे नाव घेणार? चोवीस तासांची मुदत दिल्‍याने सोमवारी ती या सर्वांची नावे उघड करणार का? याकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष लागले आहे.

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणी अटक झालेल्‍या पूजा नाईकने शुक्रवारी आपण ६०० जणांना सरकारी नोकरी मिळवून देण्‍यासाठी एक मंत्री, आयएस अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या (पीडब्‍ल्‍यूडी) अभियंत्‍याला १७ कोटी रुपये रोख दिल्‍याचा आरोप केला.

त्यानंतर राज्‍यात पुन्‍हा खळबळ माजली. आपण दिलेले १७ कोटी त्‍यांच्‍याकडून २४ तासांत न मिळाल्‍यास त्‍यांची नावेही उघड करण्‍याचा इशारा तिने दिला आहे.

राज्‍यातील अनेक भागांतील युवक–युवतींना आपली अनेक मंत्र्यांशी खास ओळख असल्‍याचे भासवून आणि त्‍यांच्‍याकडून लाखो रुपये उफाळून त्‍यांची फसवणूक केली. यातून मिळालेल्‍या पैशांतून पूजाने आलिशान वाहने, सोन्‍याचे दागिने खरेदी केले होते.

यातील एका प्रकरणात तिच्‍याविरोधात पोलिस स्‍थानकात तक्रार झाल्‍यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. त्‍यावेळी तिच्‍या जबाबातून या प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्यांसह अनेकांचा सहभाग असल्‍याचे उघड झाले.

त्‍यानुसार पोलिसांनी त्‍यांनाही अटक केलेली होती. परंतु, या सर्वांचीच जामिनावर सुटकाही झाली. या प्रकरणातून जामिनावर सुटलेल्‍या पूजाने शुक्रवारी म्‍हापशात अनेक धक्‍कादायक गोष्‍टी चव्‍हाट्यावर आणल्‍या.

‘‘युवक–युवतींना सरकारी नोकऱ्या मिळवून देण्‍यासाठी आपण त्‍यांच्‍याकडून पैसे घेतले. त्‍यातील १७ कोटी रुपये आपण एक मंत्री, आयएएस अधिकारी आणि ‘पीडब्‍ल्‍यूडी’च्‍या एका अभियंत्‍याला दिले आहेत. या सर्वांनी चोवीस तासांत आपल्‍याला १७ कोटींची रक्कम परत न केल्‍यास आपण त्‍यांची नावे उघड करू, असे तिने सांगितले.

मंत्रिमंडळ, प्रदेश भाजपातही खळबळ

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात पूजाने केलेल्‍या दाव्‍यांनंतर राज्‍य मंत्रिमंडळ आणि भाजपातही खळबळ माजली आहे. हा घोटाळा २०१९-२०२१ या काळात झाल्‍याचे आणि त्‍याच काळात आपण मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंत्‍याला १७ कोटी रुपये दिल्‍याचे तिने म्‍हटले आहे. त्‍यामुळे पूजाकडून पैसे घेणारे नेमके कोण? याचा शोध भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडूनही घेतला जात आहे.

पूजाच्‍या जिवाला धोका, संरक्षण द्या : काँग्रेस, आप

१.‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील पूजा नाईक हिने आपण मंत्री, आयएएस अधिकारी आणि ‘पीडब्‍ल्‍यूडी’च्‍या अधिकाऱ्याला १७ कोटी रुपये दिल्याचा दावा केल्‍याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. पूजा नाईकला पोलिसांनी संरक्षण देण्‍यात यावे, अशी मागणी शनिवारी प्रदेश काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) या दोन्‍ही विरोधी पक्षांनी केली.

२. पूजा नाईकने केलेला खुलासा धक्कादायक आहे. सरकारी नोकरी घोटाळ्यातील ती मुख्य संशयित असल्याने तिने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. इतकी मोठी रक्कम तिने आयएएस अधिकारी आणि ‘पीडब्‍ल्‍यूडी’मधील अभियंत्यापर्यंत पोहोचवली आहे. मंत्र्यांचा समावेश असल्याशिवाय असे घडणे शक्‍यच नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर म्‍हणाले.

३. राज्यातील कायदा–सुव्यवस्था बिघडली आहे. अशा स्‍थितीत गंभीर आरोप करणाऱ्या पूजाच्‍या जिवाला धोका असल्‍याने तिला सुरक्षा पुरविणे गरजेचे आहे, असेही त्‍यांनी नमूद केले. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनीही पूजा नाईकला संरक्षण देण्याची मागणी केली.

४.  पूजा नाईक ही नोकर भरती घोटाळ्यातील मुख्य संशयित असल्याचे सरकारनेच म्हटले आहे. त्यामुळे तिने मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंत्‍याला १७ कोटी दिल्‍याच्‍या दाव्‍याचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खुलासा करणे आवश्यक आहे. या प्रकरणात पूजाला संरक्षण मिळणे आवश्‍‍यक असल्‍याचे आपचे राज्‍य संयोजक अमित पालेकर म्‍हणाले.

पूजाला मी ओळखतही नाही : पाऊसकर :

‘जॉब स्‍कॅम’ प्रकरण २०१९ ते २०२१ या काळात झाल्‍याचा दावा पूजा नाईकने केला आहे. या काळात दीपक प्रभू पाऊस्‍कर ‘पीडब्‍ल्‍यूडी’ मंत्री होते. त्‍यामुळे त्‍यांच्‍याशी संपर्क साधला असता, पूजा नाईकच्‍या आरोपांमध्‍ये तथ्य असल्याचे मला वाटत नाही. मुळात पूजा नाईकला मी ओळखत नाही आणि तिला कधी भेटलोही नाही. त्‍यामुळे पूजा नाईकने केलेल्‍या आरोपांची पोलिसांनी चौकशी करावी, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'ये अज्ञानी', गोव्याला 'कायदाहीन' म्हणणाऱ्या केजरीवालांना भाजपने दिला दम; Post Viral

Goa Liquor Seized: 2 महिने गायब ट्रक सापडला कुंकळ्ळीत, तपासणीत मिळाली लाखोंची दारू; मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

ED Raid: दुबईत हवालामार्गे गुंतवणूक! संशयावरून ‘ईडी’ची गोवा, दिल्लीत छापेमारी; अनेकजण ताब्यात

Goa Live News: डिचोलीच्या बगलमार्गावर गुराचा बळी

Goa Crime: बंगळूरमधून आले गोवा फिरायला, जंगलात केली प्रेयसीची हत्या; संशयिताविरुद्ध आरोप निश्चित

SCROLL FOR NEXT